सोलार प्लेट पासून धोका पंजाबराव डख यांनी दिली महत्त्वाची माहिती

सोलार प्लेट पासून धोका पंजाबराव डख यांनी दिली महत्त्वाची माहिती…

सोलार प्लेट ; सोलार पंपाच्या प्लेट अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आहेत. या सोलार पंपाच्या प्लेट पासून शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता येते. या सोलार पंपाच्या प्लेट पासून धोका असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे तरी कोणती काळजी घ्यावी याबाबत पंजाबराव डख यांनी दिलेली माहिती पाहुया.

ऑगस्ट नंतर येणाऱ्या पावसात वारे, विजाचे प्रमाण अधिक असते आणि सोलार पंपाच्या बाजुला एक विद्युत कंडक्टर लावलेले असते. विद्युत कंडक्टर विजा खेचण्याचे काम करत असते. त्यामुळे पाऊस सुरू असताना सोलार पंपाच्या प्लेटजवळ कधीही थांबु नका असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.

हे वाचा – 50 हजार प्रोत्साहन अनुदानाची यादी आली लवकर ईकेवायसी करा – यादी डाऊनलोड करा

 

पंजाबराव डख म्हणाले कि मी अनेक ठिकाणी पाहिले कि पाऊस सुरू होताच शेतकरी, शेतमजूर सोलार पंपाच्या प्लेट खाली जाऊन बसतात तरी सोलार पंपाच्या प्लेटजवळ पाऊस सुरू असताना कधीही थांबु नका. सोलार पंपाच्या प्लेटजवळ विजा पडण्याची शक्यता अधिक असते, आणि तुम्ही सोलार पंपाच्या प्लेटजवळ बसलेले असाल तर तुमच्या जिवाला धोका आहे. तरी विजा पासून संरक्षण करण्यासाठी सोलार पंपाच्या प्लेटजवळ थांबु नका.

सोलार पंपाच्या प्लेटजवळ एक उंच तांब्याची टोकदार कांडी म्हणजेच विद्युत कंडक्टर बसवलेले असते. हे विद्युत कंडक्टर विजा खेचून जमिनीत नेण्याचे काम करते तरी सौर ऊर्जेच्या प्लेटजवळ पाउस पडत असताना कधीही थांबु नका असा महत्त्वाचा सल्ला हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिला आहे.

पंजाबराव डख यांचा YouTube video पाहण्यासाठी येथे क्लिक करा…

 

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com