Manikrao khule ; या आठवड्यात पावसाचा अंदाज कसा राहिल माणिकराव खुळे

Manikrao khule ; या आठवड्यात पावसाचा अंदाज कसा राहिल माणिकराव खुळे

Manikrao khule ; हवामान विभागाचे निवृत्त तज्ञ माणिकराव खुळे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा विभागानुसार अंदाज वर्तवला आहे. खुळे यांनी काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी उघडीप राहिल असा अंदाज व्यक्त केला आहे. पाहुया सविस्तर हवामान अंदाज.

मराठवाड्यात आठवडाभर पावसाचा जोर कमी होणार!

चंद्रपूर जवळ काल केंद्रित अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता पश्चिमेकडे सरकल्यामुळे आजपासून बुधवार दि. 04 सप्टेंबर पासून मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड अश्या पाच जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होईल. तेथे केवळ तुरळक ठिकाणीच किरकोळ, हलक्या ते मध्यम पावसाचीच शक्यता जाणवते.

हिंगोली जालना व छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यात दि. 04 सप्टेंबर ते मंगळवार दि. 10 सप्टेंबर पर्यंत मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही कायम आहे. Manikrao khule

मुंबईसह कोकणात अती जोरदार पाऊस माणिकराव खुळे

मान्सूनचा मुख्य आस काहीसा दक्षिणेकडे सरकलला आहे. अरबी समुद्रात संपूर्ण पश्चिम किनारपट्टी समांतर दक्षिणोत्तर ऑफ-शोअर ट्रफ ची उपस्थिती आहे. तसेच अरबी समुद्रात समुद्रसपाटीपासून दिड किमी उंचीपर्यंत ताशी 48 किमी वेगाचे येणारे आर्द्रतायुक्त पश्चिमी वारे वेग कमी होवून प्रत्यक्षात ताशी 20-25 किमी वेगाने मुंबई किनारपट्टीवर आदळत आहे. ह्या सर्व परिणामातून मुंबईसह संपूर्ण कोकणात दि. 03/ सप्टेंबर ते दि. 10/ सप्टेंबर पर्यंत आठवडाभर अतीजोरदार पावसाची शक्यता ही कायम टिकून आहे. (Meteorologist Manikrao khule (Retd) IMD Pune)

मध्य महाराष्ट्र व विदर्भ – मध्यम ते जोरदार पाऊस

नाशिक पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील पावसाचा जोर पाहता आज मंगळवार दि. 04 सप्टेंबर ते दि. 10 सप्टेंबर पर्यंत आठवडाभर धरणांतून होत असलेला जलविसर्ग असाच टिकून राहू शकतो, किंवा त्यात अधिक वाढही होवु शकते.त्यामुळे संबंधित नद्यांच्या काठावर पूर-परिस्थितीची शक्यता ही कायम राहील, असे वाटते.

05/सप्टेंबरला बं. उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असुन सप्टेंबर मधील पुढील पावसा साठी ही स्थिती पूरक ठरेल. माणिकराव खुळे (Meteorologist Manikrao khule (Retd) IMD Pune)

Leave a Comment