E-Peek Pahani 2024 : अशी करा ई पिक पाहणी, न केल्यास मिळनार नाही पिकविमा आणि अनुदान

E-Peek Pahani 2024 : अशी करा ई पिक पाहणी, न केल्यास मिळनार नाही पिकविमा आणि अनुदान…

 

E-Peek Pahani 2024 : नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात शेतकऱ्यांकरता ई -पीक पाहणी सुरू करण्यात आलेली आहे. नोंदणीसाठी गुरुवारपासून म्हणजेच 01 ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे. ०१ ऑगस्ट 2024 पासून ई -पीक पाहणी 3.0 DCS या अँप द्वारा तुम्ही ऑनलाइन एप्लीकेशन करू शकणार आहात. 15 सप्टेंबर 2024 पर्यंत शेतकऱ्यांना ही पीक पाणीची नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीच्या आधीच पीक पाहणी करून घ्यावी ,त्याची नोंदणी करून घ्यावी असं आवाहन राज्य कृषी विभागांना केले आहे.

 

 

शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव खूप संकटांना सामोरे जावे लागते. पावसातील खंड व दुष्काळी परिस्थितीमुळे, अतीव्रुष्टी ईत्यादी त्यामुळे खुप नुकसान होते तेव्हा शासकीय अनुदान किंवा पिकविमा लाभ घेन्यासाठी ई पिक पाहनी करणे आवश्यक आहे.

 

01 ऑगस्ट 2024 पासून ई-पीक विमाचे ऑनलाईन पद्धतीने एप्लीकेशन द्वारा नोंद करण्यास सुरुवात झालेली आहे . ई पिक पाहणी करन्यासाठी काही स्टेप्स आहेत त्या पाहून ई-पीक नोंदणी लवकरात लवकर करून घ्यायची आहे.

 

ई पिक पाहणी अशी करा

 

◆ सुरुवातीला ई-पीक पाहणीचं मोबाईल ॲप गूगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करा.

 

◆ तुमचा महसूल विभाग निवडा (अमरावती, छत्रपती संभाजी नगर, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे)

असे ऑप्शन असतील तुम्ही ज्या महसूल विभागातून येतात त्या महसूल विभागाला निवडायच आहे.

 

◆ महसूल निवडल्यानंतर तुम्हाला लोगिन पद्धती निवडावे लागेल त्यात पण दोन पर्याय आहेत-शेतकरी म्हणून व इतर .

तुम्हाला इथे शेतकरी म्हणून पर्याय निवडायच आहे. शेतकरी म्हणून लॉगिन करा यावर क्लिक करा

 

◆ तुमचा मोबाईल नंबर टाका.

 

◆ नंतर गाव निवडा या पर्यायाच्या खाली जिल्हा तालुका आणि गाव यांची निवड करायची आहे.सगळ्यांची व्यवस्थित एकदा निवड करून घ्यायची आहे.

 

 

◆ त्या नंतर खातेदार निवडा या पर्यायी वरती यायचा आहे, त्यामध्ये पहिले नाव, मधले नाव ,आडनाव ,खाते क्रमांक, गट क्रमांक ही सर्व माहिती तुम्हाला निवडून खातेदार निवडता येतो खातेदार इथे करता येतील.

 

◆त्यानंतर नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवण्यासाठी पुढे ऑप्शनवर क्लिक करायचे कारण तुम्ही मोबाईल नंबर आधीच टाकलेला आहे त्याच्यामुळे आता तुमच्या नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी पाठवला जाणार आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की नोंदणी झालेली असेल म्हणजे आधीच नोंदणी केलेली असेल तर ऑप्शन येतील हो किंवा नाही.

 

◆तुमच्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल खातेदाराचं नाव तिथे निवडायचंय तो ओटीपी टाकायचा आहे

 

◆ त्यानंतर पीक माहिती वरती तुम्हाला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे.

ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर काय होतं तर इथे खाते क्रमांक ,गट क्रमांक, एकूण क्षेत्र, पोट खराब हंगामा मध्ये एक पीक आहे की बहु पिक आहे, पॉलिहाऊस, शेडनेट आहे, हे सगळे पर्याय निवडायचे म्हणजे ही सगळी माहिती त्याच्यामध्ये भरायची आहे .

 

 

◆ आता तुम्हाला किती तारखेला पिकाची लागवड केलेली आहे ते इथं तुम्हाला नोंद करायची आहे.

 

◆ आता पुढे जा वरती क्लिक करायचं आता छायाचित्र असा एक ऑप्शन तुमच्या मोबाईल मध्ये तुम्हाला दिसेल त्यामध्ये छायाचित्र वरती क्लिक करायचं तुम्हाला , त्यामध्ये छायाचित्र एक आणि छायाचित्र दोन आणि तुमच्या स्क्रीनवर आलेले असतील तर एक वर क्लिक केलं की मोबाईलचा कॅमेरा सुरू होईल.

त्यानंतर सूचना येईल की तुम्ही गट क्रमांक चा कुठे उभा हात म्हणजे गट क्रमांकचा जवळपास तुम्हाला शेतात जाऊन ही पाहणी करावी लागते .

 

◆ दोन्ही फोटो काढल्यानंतर सबमिट वर क्लिक करायचं आहे… अशा पद्धतीने तुमची ई पिक पाहनी यशस्वी होईल.

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com