Ramchandra sabale ; परतीचा मान्सून कधी सुरू होणार रामचंद्र साबळे…
Ramchandra sabale ; जेष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी परतीचा मान्सून कधी सुरू होणार याबाबत अंदाज वर्तवला आहे. तसेच राज्यातील हवामान कसे राहिल याबाबत अंदाज व्यक्त केला आहे. पाहुया परतीचा मान्सून कधीपासून सक्रिय होणार.
जेष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार परतीचा मॉन्सून सुरु होण्यास काहीसा वेळ आहे. राजस्थानमध्ये अद्यापपर्यंत अधूनमधून पाऊस सुरु आहे. राजस्थानमध्ये ज्यावेळी हवेचे दाब वाढतील तेव्हा तेथे पाऊस थांबेल व वारे आग्नेयेकडून ईशान्येकडे व तेथून दक्षिण दिशेने वाहतील. तेव्हाच परतीचा मॉन्सून सुरु होईल.
साधारण वरील प्रमाणे प्रणाली तयार होण्यासाठी 10 सप्टेंबर पर्यंतचा कालावधी लागेल. त्यावेळी राज्याच्या दुष्काळी भागात जोराचा पाऊस होण्याची शक्यता राहील असे रामचंद्र साबळे यांनी आपल्या अंदाजामधे सांगितले आहे.
पश्चिम विदर्भ आणि परिसरावरीलकमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरण्याचे संकेत आहेत. आज विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता आहे. अरबी समुद्रातील ‘असना’ चक्रीवादळ निवळ्यानंतर वायव्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. पश्चिम विदर्भ आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम असून, ही प्रणाली निवळण्याचे संकेत आहेत.
पावसाची हजेरी व ढगाळ हवामानामुळे तापमानात घट झाली आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी 33.9 अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात कमाल तापमानाचा पारा 30 अंशांच्या खाली घसरला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. आज राज्यात पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. विदर्भात विजांसह मध्यम ते जोरदार
सरींचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.