लाडकी बहिण योजना टप्पा दुसरा पैसे येण्यास सुरुवात तुम्हाला आले का चेक करा…
लाडकी बहिण योजना ; लाडकी बहिण योजनेअंतर्गत दुसरा टप्पा शासनाने वितरणासाठी सुरुवात केली आहे आहे. तुम्ही जर ऑगस्ट मध्ये अर्ज केला असेल किंवा तुमचा अर्ज जुलै मध्ये केला असेल पण मंजूर ऑगस्ट मध्ये झाला असेल तर तुम्हाला आजपासून म्हणजेच 29/ऑगस्ट , 30/ऑगस्ट , 31/ऑगस्ट या तीन दिवसात जुलै आणि ऑगस्ट मिळुन दोन महिन्याचे 3000 रूपये खात्यात जमा होतील.
लाडक्या बहिणींना 29/ऑगस्ट , 30/ऑगस्ट , 31/ऑगस्ट या तीन दिवसात दोन हप्त्याचे मिळून 3000 रूपये होतील. हे 3000 रुपये महिलांच्या आधार लिंक बॅक खात्यात जमा होतील. ज्या महिलांचे अर्ज अप्रोवल आहेत आणि बॅक खात्याला आधार सिडिंग स्टेट्स ॲक्टिव आहे त्या महिलांना या तीन दिवसात 3000 रुपये जमा होतील…
तुम्हाला जर मेसेज आला असेल तर चेक करा किंवा 31/ऑगस्ट पर्यंत प्रतीक्षा करा व नंतर तुमच्या बॅंकेत जाऊन तुमच्या खात्यातील रक्कम तपासु शकता.