Ramchandra sabale ; पुढचे तीन दिवस पाऊस विश्रांती घेणार – रामचंद्र साबळे

Ramchandra sabale ; पुढचे तीन दिवस पाऊस विश्रांती घेणार – रामचंद्र साबळे

Ramchandra sabale ; जेष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी आज दि. 29/ऑगस्ट रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार राज्यात पुढे तीन दिवस म्हणजे 31/ऑगस्ट पर्यंत पावसात उघडीप असेल व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहिल.

सध्या महाराष्ट्राच्या उत्तरेस 1002 हेक्टापास्कल एवढा तर मध्यावर 1004 तर दक्षिणेस 1006 हेक्टापास्कल एवढा हवेचा दाब आहे येत्या तीन दिवसात हवेच्या दाबात वाढ होणार असून पावसात उघडीप होणार आहे. (रामचंद्र साबळे)

रामचंद्र साबळे यांनी सांगितलेल्या अंदाजानुसार विदर्भात हलक्या ते मध्यम तसेच मराठवाड्यात हलक्या उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम व कोकणात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. येत्या तीन दिवसात हवेच्या दाबात वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात पावसात उघडीप पहायला मिळेल असे रामचंद्र साबळे यांनी आपल्या अंदाजात सांगितले आहे.

मागच्या काही दिवसापासून बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे तरी शेतीच्या कामासाठी पाऊस थांबण्याची वाट बघत होते आजपासून तिन दिवस पावसात उघडीप होणार आहे तरी शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी वेळ मिळणार आहे.

 

 

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com