पातेगळ 100% थांबनार, या उपाययोजना कर मग पहा रिझल्ट (कापूस पातेगळ)
कापूस पिकामधील पातेगळ रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे, आणि पातेगळ कशामुळे होते याबाबत सविस्तर माहिती आपण या लेखातून जानून घेउयात…
पातेगळ का होते ?
१) सततचा पाऊस आणि सुर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे पातेगळ होत आसते. २) कोरडवाहू शेतात जास्त दिवस पावसाने उघडीप दिल्यास पातेगळीचे प्रमाण वाढते..३) अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पातेगळ होत आसते…४) किड रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने पातेगळ वाढते.. ५) कापूस पिकामध्ये जास्त दाटी झाल्यास पातेगळ होते… ६) नत्रयुक्त खतांच्या वापरामुळे जास्त कायीक वाढ होऊन पातेगळ होउ शकते…
पातेगळ होऊ नये यासाठी काय कराल ?
१) शेतात पाणी साचून राहू देऊ नये…
२) पावसाच्या वातावरणात बुरशीनाशकांची फवारणी करावी…
३) सतत पाऊस पडत आसेल,वापसा होत नसेल तर विद्राव्य खत फवारणीतुन द्यावीत
४) योग्य वेळी किड/रोग नियंत्रण करावे..
५) पावसाचा खंड पडल्यास पाणी द्यावे…
हि फवारणी करा,पातेगळ थांबनार…
13.40.13 किंवा 00.52.34 सोबत चिलेटेड बोराँन आणि अँन्ट्राकाँल किंवा बाविस्टीन यापैकी एक बुरशीनाशक आणि किडींच्या प्रादुर्भाव पाहून 1 योग्य किटकनाशक घेऊन फवारणी घेतल्यास पातेगळ थांबायला मदत होते..
पातेगळ जास्त प्रमाणात होत आसेल तर प्लँनोफिक्स आणि चिलेटेड बोराँन ची फवारणी केल्यास पातेगळीवर नियंत्रन मिळते…हि माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेयर करावी🙏