Heavy rain news ; या जिल्ह्याला रेड अलर्ट अती मुसळधार पावसाचा इशारा

Heavy rain news ; या जिल्ह्याला रेड अलर्ट अती मुसळधार पावसाचा इशारा

Heavy rain news ; कोकणासह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मंगळवारपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून ‘ॲरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर विदर्भातही पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला असून घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत असल्याचे दिसून येते. गोव्यासह मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी अत्यंत जोरदार, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. (Heavy rain news)

 

मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. वायव्य मध्यप्रदेश आणि लगतच्या पूर्व राजस्थानामध्ये तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. (Heavy rain news) तसेच दक्षिण गुजरात ते दक्षिण केरळ किनारपट्टीलगत वाऱ्याची द्रोणिय रेषांनी जात आहे. या प्रभावामुळे राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला आहे.

कोकणासह मध्य महाराष्ट्रात सोमवारी आणि मंगळवारी ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी अति जोरदार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

 

या जिल्ह्यांना हवामानशास्त्र विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. तसेच विदर्भात बहुतांश जिल्ह्यांमध्ये गुरुवार आणि शुक्रवारपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भात बऱ्याच ठिकाणी ‘येलो अलर्ट’ दिला आहे.

पुणे आणि आसपासच्या परिसरात सोमवारी (ता. २६) आकाश सामान्यतः ढगाळ राहून अधून मधून मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर, मंगळवारी (ता. २७) आकाश सामान्यतः ढगाळ राहून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. (Heavy rain news)

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com