रामचंद्र साबळे म्हणतात या भागात अतिवृष्टी होणार – हवामान अंदाज
रामचंद्र साबळे यांनी आज नवीन हवामान अंदाज वर्तवला असुन राज्यात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी होईल व जोरदार वारे आणि विजाचे प्रमाण अधिक असेल तरी सर्व नागरीकांनी सतर्क रहावे असे हवामान खात्याने सांगितले आहे.
महाराष्ट्रावर आज आणि उद्या हवेचे दाब उत्तरेस 1002 व मध्यावर 1004 हेप्टापास्कल, तर मंगळवार ते गुरुवार या दरम्यान 1000 ते 1002 हेप्टापास्कल इतके राहतील. शुक्रवारी आणि शनिवारी हवेचे दाब उत्तरेस पुन्हा 1002 ते 1004 हेप्टापास्कल व दक्षिणेस 1006 हेप्टापास्कल इतके कमी राहण्यामुळे राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता निर्माण होईल.
हे वाचा – लाडकी बहिण योजनेची कोणतीही तक्रार असल्यास या नंबरवर करा whatsaap तक्रार
उत्तर कोकणात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबईमध्येही जोरदार पावसाची शक्यता राहील. तुलनेने मराठवाड्यात मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील. पश्चिम विदर्भांसह मध्य विदर्भातील यवतमाळ, पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया, दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील पुणे येथे काही दिवशी मुसळधार पावसाची शक्यता आहे. वाऱ्याच्या वेगातही काही दिवशी वाढ होईल. विशेष करून नाशिक, धुळे, नंदुरबार, बांड, छत्रपती संभाजीनगर, सांगली, सोलापूर व नगर जिल्ह्यांत वारे ताशी 30 कि.मी. वेगाने वाहतील.
25 Aug, past 24 hrs Rainfall over Mumbai Thane, mod to heavy in the range of 70-100 mm
Latest satellite obs indicate reduced intensity of rainfall over these areas for the next 3,4 hrs. Intermittent heavy showers.
Watch update from IMD pl pic.twitter.com/CoVumSeyuo— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 25, 2024
आकाश पूर्णतः ढगाळ राहणे शक्य आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. सकाळची व दुपारची सापेक्ष
आर्द्रता 90 टक्के किंवा त्याहून अधिक राहण्यामुळे पावसाच्या वितरणाचा वेग वाढेल. ‘ला- निना’चा प्रभाव वाढत असल्याने पावसाच्या प्रमाणात वाढ होणे शक्य आहे. प्रशांत महासागराचे पृष्ठभागाचे पाण्याचे तापमान इक्वाडोरजवळ 22 अंश सेल्सिअस, तर पेरूजवळ 10 अंश सेल्सिअस पर्यंत घसरले असून तिकडे हवेचे दाब वाढतील. त्यामुळे अरबी समुद्र, हिंदी महासागरावरील वारे नैर्ऋत्य दिशेने भारताचे भूपृष्टाच्या दिशेने येत आहेत. गुजरातजवळ गुरुवारी लहान चक्रीय वादळाची निर्मिती होईल.\