Subsidy status check ; कापूस सोयाबीन अनुदान आले का चेक करा ऑनलाईन मोबाईल वर…

Subsidy status check ; कापूस सोयाबीन अनुदान आले का चेक करा ऑनलाईन मोबाईल वर…

Subsidy status check ; राज्य सरकारकडून गेल्या वर्षी कापूस आणि सोयाबीनची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून हेक्टरी ५००० रूपये दोन हेक्टर मर्यादेत अनुदान दिले जात आहे. मागच्या वर्षी पडलेल्या बाजार भावामुळे तसेच दुष्काळामुळे आर्थिक नुकसान झाले होते त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हे अनुदान दिले जात आहे.

कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी कृषी सहाय्यकाकडे अर्ज दाखल केले असून या अनुदानाचे वितरण सुरू करण्यात आले आहे. कापूस आणि सोयाबीन चे अनुदान तुम्हाला मिळाले का हे तुम्ही तुमच्या मोबाईल वर ऑनलाईन तपासु शकता. तुम्हाला अनुदान मिळाले का हे चेक करण्यासाठी खालील स्टेप बाय स्टेप प्रोसेस पुर्ण करा. Subsidy status check

तुमच्या कापूस सोयाबीन अनुदानाची स्थिती चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

 

सोयाबीन कापूस अनुदानाचे स्टेटस कसे पहावे – (subsidy status check)

1) सर्वप्रथम https://scagridbt.mahait.org/FarmerLogin/Login या वेबसाइटला भेट द्या.

2) त्यानंतर Disbursement status या ॲप्शन वर क्लिक करून आधार नंबर आणि कॅप्चा टाका.

3) पुढे तुम्हाला एक नोंदणी कृत मोबाईल वर एक otp येईल तो ओटीपी टाका आणि गेट आधार वर क्लिक करा.

 

तुमच्या कापूस सोयाबीन अनुदानाची स्थिती चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

 

त्यानंतर तुम्हाला तुमच्या अनुदानाची स्थिती दिसेल. जर काही error येत असेल तर तुमचा डाटा अजून सबमिट झाला नाही तरी एक दोन दिवसानंतर तुम्ही तुमच्या अनुदानाची स्थिती चेक करा. अशा प्रकारे तूम्ही तुमच्या कापूस सोयाबीन अनुदानाची स्थिती पाहू शकता.

 

 

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com