Soyabin news ; यंदा सोयाबीनची खरेदी या दरात होणार केंद्रीय कृषिमंत्री यांचे आश्वासन
Soyabin news ; सरकार शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव देणार आसून त्यासाठी सरकार तीन पर्यायांवर काम करत आहे. सरकार एकतर हमीभावाने सोयाबीनची खरेदी करेल, किंवा सोयाबीनसाठी भावांतर योजना राबवेल किंवा खासगी खरेदीदारांना सोयाबीन खरेदीसाठी 15 टक्के निधी देईल, असे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले आहे. (Soyabin market news today)
देशातील बाजारात सध्या सोयाबीनचा भाव पडला आसून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे पुरवठा वाढण्याची शक्यता आहे त्याचा दबाव आंतरराष्ट्रीय बाजारातील भावावर आला. याचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरही होत आहे. त्यामुळे सोयाबीनचा भाव 4 हजारांच्या पातळीवर आला आसून सध्या 4 हजारांपेक्षा कमी भाव सोयाबीनला मिळत आहे. (India soyabin news)
हे वाचा – 50 हजार प्रोत्साहन अनुदानाची यादी आली लवकर ईकेवायसी करा – यादी डाऊनलोड करा
सोयाबीनचा भाव दबावात असल्याने सरकारने हमीभावाने खरेदी करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीचा हाच धागा पकडत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सरकार सोयाबीनला हमीभाव देईल, याची घोषणा केली. सोयाबीनला किमान हमीभाव मिळावा यासाठी सरकार तीन पर्यायांवर विचार करत आहे, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी सरकार खरेदीत उतरेल, असे चौहान यांनी सांगितले. यंदा सरकारने सोयाबीनला 4 हजार 892 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. सरकारने सोयाबीनची खरेदी सुरु केल्यास खुल्या बाजारात सोयाबीनच्या भावाला आधार मिळेल आणि सोयाबीनला हमीभाव मिळेल.
केंद्रीय कृषिमंत्र्यांनी सांगितले की, सरकार शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी भावांतर योजनेचाही विचार करत आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन बाजारात कमी भाव मिळाला तर सरकार हमीभाव आणि शेतकऱ्यांना बाजारात मिळालेला भाव यातील फरक देईल, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी सरकार आणखी एका पर्यायावर विचार करत असून या पर्यायानुसार बाजारात खरेदी करणाऱ्या खासगी व्यापाऱ्यांना हमीभावाने शेतीमाल खेरदीचे बंधन घालण्यात येईल. सरकार या खेरदीदारांना सोयाबीन खरेदीसाठी 15 टक्के मदत करेल, असेही कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले.
हे वाचा – पंजाबराव डख म्हणतात या भागात पाच दिवस अतिवृष्टी होणार पहा नवीन अंदाज
पंजाबराव डख लाईव्ह ; पुढे पाच या भागात अतिवृष्टी होणार पंजाबराव डख अंदाज..