Ladki bahin yojna ; लाडकी बहीण योजनेचे 3,000 रूपये मिळाले नाही कधी मिळणार

Ladki bahin yojna ; लाडकी बहीण योजनेचे 3,000 रूपये मिळाले नाही कधी मिळणार

Ladki bahin yojna ; लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन हप्त्यांचे मिळून 3,000 रूपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या आधार लिंक बॅक खात्यात हे पैसे DBT द्वारे टाकण्यात येत आहे. राज्यातील काही महिलांचे अर्ज अप्रोवल असताना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत त्याचे काय कारण आहे आणि त्या महिलांना हे पैसे कधी मिळणार याबाबत माहिती पाहुया..

 

तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे का आले नाहीत…

1) तुमच्या बॅक खात्याला आधार लिंक नसेल.

2) तुमचा अर्ज उशिरा अप्रोवल झाला असेल.

3) आज उद्यापर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.

 

लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत तर कधी मिळणार

ज्या महिलांना बॅंक खाते आधारशी लिंक नसल्यामुळे पैसे जमा झाले नाही अशा महिलांनी आपल्या बॅंकेत जाऊन आधार लिंक करून घ्यावे. आधार लिंक झाल्यावर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. तुमचा अर्ज अप्रोवल असेल तर तुम्हाला फक्त बॅंक खाते आधारशी लिंक आहे का हे चेक करायचे आहे. तुमचे आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे 100% मिळतील. (Ladki bahin yojna)

 

हे वाचा – बॅंक खात्याला आधार लिंक कसे करावे संपूर्ण माहिती पहा – तरचं खात्यात 3000 जमा होणार

 

अनेक महिला लाभार्थी अर्ज भरताना दिलेल्या बॅंक खात्यात पैसे जमा झाले का चेक करत आहेत. परंतु DBT द्वारे तुमच्या आधार लिंक बॅंक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केले आहे तरी तुमच्या आधारशी कोणती बॅंक लिंक आहे ते चेक करून त्या बॅंकेत पैसे जमा झाले का चेक करा.

ज्या महिलांचे अर्ज ऑगस्ट मध्ये भरले आहेत त्या महिलांचे अर्ज अप्रोवल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ऑगस्ट मध्ये अर्ज केलेल्या महिलांना सप्टेंबर मध्ये तीन हप्त्यांचे मिळून 4500 रूपये खात्यात जमा होतील.

हे वाचा – लाडकी बहिण योजनेचे पैसे फक्त या बॅंकेत जमा होणार – तुमची बॅंक कोणती तपासा

Aadhaar link Bank account ; लाडकी बहिण योजनेचे पैसे या खात्यात जमा होणार… 

 

Leave a Comment