Havaman andaj ; राज्यातील या भागात पावसाचा जोर वाढणार

Havaman andaj ; राज्यातील या भागात पावसाचा जोर वाढणार

Havaman andaj ; सध्या राज्याच्या बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली आहे. तसेच काही भागात मध्यम ते हलक्या सरी बरसत आहेत. हवामान खात्याने पुढचे चार दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

दि.१७/ऑगस्ट रोजी म्हणजे उद्या विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशीम, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला असून जोरदार पावसाचा अंदाज आहे.

 

मराठवाड्यातील हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असुन मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर आणि जळगाव या जिल्ह्यात सुद्धा यलो अलर्ट जारी केला असून जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

 

१८/ऑगस्ट १९/ऑगस्ट रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात जिल्ह्यात बहुतांश भागात जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

२०/ऑगस्ट पासून कोंकणात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सध्या दुपारी कडक उन पडत असून उकाड्यात वाढ झाली आहे.

 

नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रभाव कमी पुढे तीन दिवस पाऊस कसा राहणार – रामचंद्र साबळे

 

नैऋत्य मोसमी वारे कमजोर पुढचे तीन दिवस पाऊस कसा राहिल – रामचंद्र साबळे

 

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com