Ladki Bahin Yojana ; 3000 रूपये जमा झाले नाही, आता काय करायचे?

 

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यात आलेले आहेत. महिलांना एकूण दोन महिन्याचे 3000 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. परंतु मोठ्या प्रमाणावर महिलांना आणखी हप्ता त्यांच्या बँक खात्यात मिळालेला नाही. यामागील कोणती महत्त्वाची मुख्य कारणं असतील ? याबाबत या लेखात सविस्तर पाहुयात…

 

Ladki Bahin Yojana Installment ; महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा पहिला व दुसरा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. काही महिलांना अद्याप हप्ता मिळालेला नाही, याची कोणती मुख्य कारणे असू शकतात, याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

 

यासाठी तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे का ? ऑनलाईन चेक केल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर दाखवत आहे का ? अर्जाची स्थिती तपासल्यानंतर अर्ज Rejected असं तरी दाखवतोय का ? या सर्व बाबी तुम्ही ऑनलाईन चेक केल्या पाहिजेत ! तरच तुम्हाला अर्जांमधील त्रुटी समजेल.

 

बँकेत पैसे जमा न होण्याच दुसर मुख्य महत्त्वाच कारण म्हणजे, बँक खाते आधार कार्डशी लिंक नसलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. महिलांनी बँक खात्याशी आधार नंबर लिंक करणे गरजेचे आहे. आपला आधार नंबर बँक खात्याशी लिंक आहे की नाही ? हे तपासणे गरजेचे आहे.

 

तुम्ही अर्ज दाखल केल्यानंतर तुमच्या अर्जासमोर pending, Review असं दिसत असेल, तर घाबरण्याचं कारण नाही. तुमच्या अर्जाची छाननी होत आसून अर्ज मंजूर झाल्यावर पुढील महिन्यात एकत्रितपणे 4500 रूपये तुमच्या. खात्यात जमा केले जातील.

 

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com