havaman update ईशान्य मान्सून सक्रिय होणार या भागात जोरदार पावसाची शक्यता रामचंद्र साबळे

havaman update ईशान्य मान्सून सक्रिय होणार या भागात जोरदार पावसाची शक्यता रामचंद्र साबळे

havaman update ; जेष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी पुढच्या आठवड्याचा हवामान अंदाज तसेच हवामान बदलाची माहिती दिली आहे. रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रावर हवेच्या दाबात वाढ होत आहेत. हवेचे दाब आठवडाभर १००६ हेप्टापास्कल इतके अधिक राहण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भावर आणि मराठवाड्याचे काही भागांत १००४ हेप्टापास्कल
इतका कमी हवेचा दाब राहणे शक्य आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचे प्रमाण मध्यम स्वरूपात राहण्याची शक्यता आहे.

कोकणात पावसाचा जोर कमी झाला आहे. उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रात हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता राहील. राजस्थान वरील हवेच्या दाबात वाढ होत असून वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. यावरून परतीच्या मॉन्सूनची पूर्वतयारी सुरू झालो असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच ईशान्य भारतावरील हवेचे दाब कमी होत आहेत. त्यामुळे ईशान्य मॉन्सूनची पूर्वतयारी सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे.

प्रशांत महासागराच्या पेरूजवळ समुद्राच्या पाण्याचे विषुववृत्तीय भागातील तापमान १३ अंश सेल्सिअस व इक्वेडोरजवळ २३ अंश सेल्सिअस राहण्यामुळे ‘ला-निना’चा प्रभाव सुरू होईल. त्यानंतर पावसाचे प्रमाणात वाढ होईल.

 

ईशान्य मान्सून सक्रिय होणार या भागात जोरदार पावसाची शक्यता रामचंद्र साबळे

Leave a Comment