कापूस सोयाबीन अनुदानासाठी ई-पिक पाहणी ची अट रद्द फक्त हे काम करा.

कापूस सोयाबीन अनुदानासाठी ई-पिक पाहणी ची अट रद्द फक्त हे काम करा…

कापूस सोयाबीन अनुदान ; मागील वर्षी कापूस आणि सोयाबीन पिकाचे दुष्काळ तसेच बाजारभाव पडल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५००० रूपये दोन हेक्टर च्या मर्यादेत अनुदान दिले जाणार आहे.

 

अनुदानासाठी सरकारने गेल्या वर्षी (२०२३-२४) मध्ये कापूस आणि सोयाबीनची ई-पिक पाहणी केली त्या शेतकऱ्यांना देण्याची अट घातली होती. या अटीमुळे अनेक कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार होते. तरी अनेक शेतकऱ्यांनी तांत्रिक अडचणी मुळे ई-पिक पाहणी केलेली नाही. (कापूस सोयाबीन अनुदान)

 

अनेक शेतकऱ्यांना स्मार्ट फोन नाही तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेतात मोबाईलला नेटवर्क उपलब्ध नसते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी केली नव्हती. या शेतकऱ्यांना हेक्टरी ५००० रूपये याप्रमाणे अनुदान मिळावे यासाठी शेतकरी संघटना तसेच वृत्तपत्रांतून पाठपुरावा केला होता तरी या पाठपुराव्याची शासनाने दखल घेत अनुदानासाठी ई-पिक पाहणी ची अट रद्द केली आहे.

 

ई-पिक पाहणीची अट रद्द शेतकऱ्यांना अनुदान कसे मिळणार…

शासनाने ई-पिक पाहणी ची अट रद्द केली असून शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी हमीपत्र कृषी विभागाकडे दिल्यावर शेतकरी अनुदानासाठी पात्र होणार आहे. शासनाने ई-पिक पाहणी ची अट रद्द केल्याने कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (कापूस सोयाबीन अनुदान)

सोयाबीन कापूस अनुदानासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे हमीपत्र सादर करावे.

 

परतीच्या पावसाला पोषक वातावरण, आता पावसाचा जोर वाढनार – रामचंद्र साबळे

 

Monsoon news ; परतीच्या पावसाला पोषक वातावरण, पावसाचा जोर वाढनार – रामचंद्र साबळे

Leave a Comment