केंद्र सरकारचा निर्णय शेतकऱ्यांच्या मुळावर ; खाद्यतेल आयातीच्या निर्णय..
केंद्र सरकारचा निर्णय ; सोयाबीनचे बाजारभाव गेल्या हंगामापासून पडलेले आहेत. मागील वर्षी केंद्र सरकारने (2023-24) सोयाबीन ला 4600 रुपये एवढा हमीभाव जाहीर केला होता परंतु सोयाबीन चे बाजारभाव 4000 ते 4300 यादरम्यान राहिले होते. यंदा (2024-25) मध्ये सरकारने सोयाबीन साठी 4892 रूपये एवढा हमीभाव जाहीर केला आहे.
देशात तेलबियाचे लागवड क्षेत्र कमी असुन देशातील उत्पादीत होणाऱ्या तेलापासून देशाला आवश्यक असलेल्या तेलाची गरज पुर्ण होत नाही. त्यामुळे देशाची गरज भागवण्यासाठी बाहेरील देशातून खाद्यतेलाची आयात करावी लागते. खाद्यतेलाची तुटवडा निर्माण झाला तर तेलाचे दर वाढतात व ग्राहकांकडून आरडाओरडा केली जाते. खाद्यतेलाचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार ला तेलाची आयात करावी लागते.
हे वाचा – लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत काय आहे कारण पहा
येत्या काही दिवसात नवीन सोयाबीनची बाजारात आवक सुरू होईल आणि सन उत्सव सुद्धा सुरू होतील परिणामी खाद्यतेलाचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणुन सरकारने जुलै मध्ये 19 लाख लिटर तेलाची आयात केली आहे. मागील काही वर्षांत हि एक महिण्यात विक्रमी आयात असल्याचे सांगितले जात आहे. तसेच सरकार ऑगस्ट मध्ये 15 लाख लिटर तेलाची आणि सप्टेंबर महिन्यात 14/ लाग लिटरची आयात होणार आहे असे सुत्रांनी सांगितले आहे.
खरिपातील नवीन सोयाबीन लवकरच बाजारात येणार आहे आणि अशा वेळी तेलाची आयात केल्यास सोयाबीन चे भाव दबावातच राहतील अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. सरकारने आयात शुल्कात वाढ करावी आणि शेतकऱ्यांना 4892 रूपये एवढा हमीभाव मिळावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. अन्यथा बाजार भाव आणि हमीभाव याच्या फरकातील रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी केली जात आहे.
हे वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तर… लाडकी बहिन योजनेत दरमहा 3000 रुपये मिळणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तर… लाडकी बहिण योजनेचे 3000 रूपये दर महिन्याला मिळतील