पंजाब डख हवामान अंदाज लाईव्ह ; या भागात पावसाचा जोर वाढणार… 

पंजाब डख हवामान अंदाज लाईव्ह ; या भागात पावसाचा जोर वाढणार… 

 

पंजाब डख हवामान अंदाज ; मराठवाड्यातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी आज दि. 17/ऑगस्ट रोजी नवीन हवामान अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार राज्यात उद्यापासून पावसाला सुरूवात होणार असून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

 

विदर्भात आणि मराठवाड्यात उद्यापासून (18/ऑगस्ट) पावसाला सुरूवात होईल. मराठवाड्यात आणि विदर्भात 24/ऑगस्ट पर्यंत पाऊस सुरू राहील असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात दि. 18/ऑगस्ट पासून पावसाला सुरूवात होणार आहे तरी शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन करावे.

 

मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव, परभणी विदर्भातील यवतमाळ, नागपूर, अकोला, अमरावती, हिंगोली, वाशिम, परभणी, बुलढाणा, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तसेच आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे, सांगली जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहील. बीड, लातूर, नगर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक असेल.

हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी 18/ऑगस्ट ते 02/सप्टेंबर पर्यंत पावसाचा अंदाज असल्याचे सांगितले आहे. विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांनी जनावरांना तसेच स्वतःची काळजी घ्यावी असे पंजाब डख यांनी सांगितले आहे.

पंजाब डख यांचा हवामान अंदाज पाहण्यासाठी खालील YouTube video पहा..

 

 

 

 

Leave a Comment