हवामान अंदाज ; राज्यात 26 ऑगस्ट पर्यंत आणि पोळ्याच्या सणाला मुसळधार पाऊस ….

Panjab dhak ; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नविन हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे . आता सद्ध्या उन्हाचा तडाखा पडलेला दिसत आहे , परंतु पंजाबराव डख यांनी सांगितलेल्या अंदाजानुसार 21 ऑगस्ट पासून ते 26 ऑगस्ट पर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे .

 

दिवसाच्या दुपारपर्यंत ऊन राहणार , आणि रात्री जोरदार पाऊस पडणार आहे . बीड जिल्ह्यात 21 ऑगस्ट पासून म्हणजे आज रात्री पासून ते 22 , 23,24,25,26 ऑगस्ट पर्यंत पाऊस पडणार असून , शेतात पाणी साचण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केली आहे .

 

येणाऱ्या तीन, चार दिवसांत सर्व राज्यांत म्हणजेच श्रीरामपूर , पैठण , नगर , वैजापूर , कोकण या भागात चांगला पाऊस पडणार आहे . बीड जिल्ह्यात जास्त पाऊस पडणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे . पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांनी काढणीस आलेला मुग , उडीद आजच्या दिवसात काढून घेण्याचा सल्ला दिला आहे , कारण आजपासून म्हणजेच 21 ऑगस्ट पासून ते 26 ऑगस्ट पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी दिली आहे .

 

27,28,29 ऑगस्ट या तीन दिवस हवामान कोरडे राहील , परंतु पोळ्याच्या सणाला परत पाऊस पडणार आहे . राज्यात सर्व ठिकाणी पूर्व विदर्भ , पश्चिम विदर्भ , दक्षिण महाराष्ट्र , उत्तर महाराष्ट्र , कोकणपट्टी , खानदेश , मराठवाडा या सर्व भागात जोराचा पाऊस पडणार आहे . तळ्याला , विहिरीला पाणी येईल. लगेच हवामानात बदल झाला तर , लगेच मॅसेज देण्यात येईल , असं पंजाबराव डख यांनी सांगितले आहे .


Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com