लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले नाही काय करावे – मंत्री आदिती तटकरे

लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले नाही काय करावे – मंत्री आदिती तटकरे

लाडकी बहिण योजना ; जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे मिळून 3,000 रूपये आता पर्यंत पात्र महिलांच्या (80 लाख) खात्यात जमा झाले असल्याचे महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. या योजनेसाठी केलेल्या अर्जापैकी अनेक महिलांचे अर्ज बाद झाले आहे तसेच उशिरा अर्ज केलेल्या महिलांना सुद्धा अजून या योजनेचा लाभ मिळालेला नाही.

सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 17/ऑगस्ट पर्यंत पात्र महिलांच्या खात्यात दोन हप्ते जमा होतील जर 17/ऑगस्ट पर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर असून सुद्धा पैसे मिळाले नाही तर तुम्हाला तुमच्या बॅंकेशी आधार सिडींग स्टेट्स चेक करुन ॲक्टिव नसेल तर ॲक्टिव करावे लागेल. लाडकी बहिण योजनेचे पैसे थेट DBT द्वारे आधार लिंक बॅंकेत जमा होत असल्याने तुमचे आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव असने आवश्यक आहे.

हे वाचा – तुमच्या बॅंक खात्याला आधार लिंक आहे का चेक करा

 

तुम्ही बॅंकेशी आधार लिंक केल्यानंतर तुमचे पैसे जमा होतील तरी महिलांनी निश्चित रहावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

 

ज्या महिलांचे अर्ज 01/ऑगस्ट नंतर केले आहे त्या महिलांचे अर्ज मंजूर होण्याची प्रक्रिया सुरू केली असून लवकर हे अर्ज मंजूर होतील व उशिरा अर्ज केलेल्या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर चे मिळुन तीन हप्ते (4500) एकदाच जमा होतील असे ही सरकारने सांगितले आहे.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक महिलांना महत्त्वाची माहिती दिली असून अर्ज करण्याची तारीख हि 31/ऑगस्ट नसुन निरंतर चालू राहणार आहे. तरी ज्या महिलांनी अटी/शर्ती च्या बंधनांमुळे अर्ज केले नाही त्या महिलांना ऑगस्ट नंतर सुद्धा अर्ज करता येणार आहे.

 

लाडकी बहिण योजनेचे पैसे फक्त या बॅंकेत जमा होणार – तुमची बॅंक कोणती तपासा

Aadhaar link Bank account ; लाडकी बहिण योजनेचे पैसे या खात्यात जमा होणार… 

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com