लाडकी बहिण योजनेचे नवीन फॉर्म भरणे 31/ऑगस्ट ला बंद होणार का मंत्री आदिती तटकरे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची मुदत संपणार आहे का? असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे. कारण राज्य सरकारने 31 ऑगस्ट ही अर्जाची अंतिम मुदत सांगितली होती. मात्र त्यानंतर मुदतीत वाढ केल्याचे देखील सांगितले होते. त्यामुळे खरंच 31 ऑगस्टची मुदत संपणार आहे का? आणि अर्जाची (Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme) शेवटची तारीख काय असणार आहे? हे जाणून घेऊयात.
लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर सुरूवातीला सरकारने 31 जुलैची मुदत दिली होती. मात्र महिलांची कागदपत्रांसाठीची जमवाजमव आणि सरकारी कार्यालयातील गर्दी पाहता सरकारने योजनेच अर्ज करण्याची मूदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली होती. त्यानंतर ऑगस्टच्या मध्यंतरी देखील अर्जात मुदतवाढ दिल्याची बातमी समोर आली होती. पण नेमकी तारीख सांगण्यात आली नसल्याने महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. त्यात आता 31 ऑगस्ट उद्यावर आल्याने महिलांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे नेमकी शेवटची तारीख काय आहे? असा प्रश्न महिलांना पडला आहे.
रोखठोक प्रश्न अन् प्रामाणिक उत्तरं…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सर्व शंका/कुशंकांचे निराकरण करणारी मुलाखत !https://t.co/5Mh5QNO1YF@NDTVMarathi @RahulAsks
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) August 25, 2024
अर्जाची अंतिम तारीख काय?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. त्यामुळे अर्ज करण्याची आता कोणतीही शेवटची तारीख देण्यात आली नाही. तुम्हाला आता कधीही अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अर्ज पडताळणीला सुरुवात
तसेच 31 जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हास्तरावर पडताळणी सूरू आहे. जिल्हास्तरावर मान्यता प्राप्त अर्जाचा डेटा महिला व बाल विकास विभागाकडे येताच ती यादी बँककडे पाठवली जाणार आहेत.ही सगळी प्रक्रिया युद्ध पातळीवर सूरू असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी एक्सवर दिली होती.
त्यामुळे आता महिलांच्या अर्जाची पडताळणी युद्धपातळीवर सूरू झाली आहे. या काळात महिलांना अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज येणार आहेत. या मेसेजनंतर सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांनी आपला अर्ज मंजूर होतोय का? याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासह इतरही अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे अनिवार्य आहे.
आपले बँक खाते आधार कार्डशी संलग्न आहे का हे कसे तपासावे ? नसेल तर ते संलग्न कसे करावे ?
याची परिपूर्ण माहिती देणारी ही ध्वनी चित्रफीत… pic.twitter.com/tUqKqJa0Qt— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) August 29, 2024