मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत या महिलांना मिळणार 4500 रूपये

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत या महिलांना मिळणार 4500 रूपये

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत पहिल्या टप्प्यात महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकत्रित 3000 रूपये जमा झाले आहेत. आता सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.त्यात या योजनेत ज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज केले आहेत, त्यांच्या खात्यात थेट 4500 डिपॉझिट होणार आहेत. पण तत्पुर्वी हे काम आताच करून घ्या. नाहीतर लाडकी बहिण योजनेचेज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज भरले आहेत. त्या महिलांना आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकत्रित मिळून 4500 रूपये खात्यात जमा होणार आहे. तर ज्या महिलांचे अर्ज आधीच मंजूर आहेत, त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच 1500 रूपये जमा होणार आहेत.

 

आता ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत आणि त्यांचे अर्ज मंजूर व्हायचे आहेत. त्या महिलांचे अर्ज मंजूर व्हायला आता सुरूवात झाली आहे. त्यामुळे या महिलांनी आपला अर्ज नियमित तपासावा. त्या अर्जावर काय उत्तर येतेय. जर तुम्हाला रिसबमिटचा पर्याय दिला असेल, तर संबंधित कागदपत्र पुन्हा अपलोड करून तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचा आहे. ती प्रक्रिया केल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर होणार आहे.

तुम्ही कदाचित फोटो व्यवस्थित अपलोड केला नसेल. कागदपत्र अपलोड करायचं राहून गेलं असेल किंवा कागदपत्रे स्पष्ट दिसत नाही, अशी अनेक कारणामुळे तुम्हाला अर्ज पुन्हा सबमिट करायचा पर्याय दिला जातो. त्यानूसार अर्ज पुन्हा भरून सबमीट करायचा आहे.

 

जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तरी काळजी करण्याचे कारण आहे.कारण तुम्ही जे बँक अकाऊंट अर्जात भरले आहे. बँक अकाऊंट आधारकार्डशी लिंक असणे गरजेचे आहे. जर आधारशी बँक लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाही. त्यामुळे आधी तुमचं बँक अकाऊंट आधारशी लिंक आहे का? हे तपासून घ्या. नसेल तर लगेच बँक अकाऊंट आधारशी लिंक करून घ्या. तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टी आवर्जून घ्या.

 

दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरु आहे. 31 जुलै पर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला होता, त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. 31 जुलैनंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरु आहे. आत्तापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी 2 कोटी 6 लाख 14 हजार 990 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 1 कोटी 47 लाख 42 हजार 476 अर्ज पात्र ठरले आहेत. तर 42 हजार 823 अर्जाची पडताळणी सुरु आहे.

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com