पोळा अमावस्या कापुस फवारणी ; पोळ्याच्या अमावस्येलाच का फवारणी करावी 

पोळा अमावस्या कापुस फवारणी ; पोळ्याच्या अमावस्येलाच का फवारणी करावी 

पोळा अमावस्या कापुस फवारणी ; पोळ्याच्या अमावसेचे आणि कापुस फवारणीचे खुप जुने कनेक्शन आहे.कापुस पिकाचे बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे 40 ते 50 टक्क्यापर्यत नुकसान होत असते.हे नुकसान टाळण्यासाठी आपल्याला पोळ्याच्या अमावस्येला फवारणी करणे जरुरीचे असते.जेनेकरुन पुढे होनारे नुकसान आपल्याला टाळता येईल. तर पोळ्याच्या अमावस्येलाच का फवारणी करावी यामागील शास्त्रिय कारण काय आहे, ते या लेखात सवीस्तर पाहुया :

अमावसेचे आणि कापुस फवारणी चे काय कनेक्शन आहे ?

आता भरपूर शेतकर्याला पडणारा प्रश्न आहे,कि पोळ्याच्या अमावसेलाच फवारणी का करावी ? तर याचे उत्तर आहे, आता कापुस पिकाला पाते,फुलधारणा होत आहे.लवकर लागवड झालेल्या पिकाला बोंडेसुद्धा लागत आहे.अशा अवस्थेत बोंडअळीचा पिकावर अँटक होत असतो. बोंडअळीचे पतंग हे अमावस्येच्या ( अंधार्या रात्री ) रात्री अंडी घालतात.व त्यातुन दोन तीन दिवसात अळी बाहेर येत असते. त्यासाठी आपल्याला अमावस्येच्या आधी एक दोन दिवसानी किंवा नंतर एक दोन दिवसात अंडीनाशक किटकनाशकाची फवारणी करावी लागेल.

पोळा अमावस्या कापुस फवारणी ?Cotton spray

बोंडअळीचे अंडी नष्ट करण्यासाठी प्रोफेनाफाँस 40 % सायपरमेथ्रिन 04 % घटक असलेले कोनत्याही कंपनीच्या किटकनाशकाचा वापर करता येतो.याबरोबर पातेगळ होऊ नये म्हणुन बुरशीनाशक व पिकाच्या सर्वागीन विकासासाठी चांगल्या दर्जाचे टाँनिकचा वापर करावा. पातेधारणा कमी असेल तर 12-60-00 या विद्राव्य खताचा सुध्दा अवश्य वापर करावा.

कोणत्या किटकनाशकाची फवारणी करावी यासाठी हा विडीओ पहा.

फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी.
1) फवारणीचे चांगले रिझर्ट येण्यासाठी सिलीकॉन बेस स्टिकर अवश्य वापरावे.
2) पावसाचे किंवा खुप दिवसाचे साठवलेले पाण्याचा वापर करू नये,चांगल्या पाण्याचा वापर करावा.
3) कंपनीने सांगीतल्याप्रमाणे औषधाचे प्रमाण वापरावे कमी जास्त करु नये.
4) किटकनाशकाच्या डब्यावरील लेबल जरुर वाचावे . 5) कृषी सेवा केंद्र चालकाचा सल्ला अवश्य घ्यावा.

 

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com