पंजाबराव डख ; आजपासून मुसळधार पाऊस, इतके दिवस पावसाचा मुक्काम..

पंजाबराव डख ; आजपासून मुसळधार पाऊस, इतके दिवस पावसाचा मुक्काम...

पंजाबराव डख ; पंजाब डख यांनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस कसा असेल याचा अंदाज जाहीर केला आहे, चला तर पंजाबराव डख यांचा अंदाज या लेखातून सविस्तर पाहूया….

1 ते 5 सप्टेंबरपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.पंजाब डख यांनी आजपासून मुसळधार पाऊस सुरू होऊन 5 सप्टेंबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

हवामान अंदाज पंजाबराव डख

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, तसेच कोकणात 1 ते 5 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडेल.. या पावसात जायकवाडी धरण आणि छोटे तलाव भरले जातील.. हा पाऊस मोठ्या थेंबांसह, वारा आणि विजांच्या कडकडाटासह येईल. त्यामुळे विजा चमकत असताना शेतकऱ्यांनी झाडाखाली बसू नये, अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे…

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून या पावसात विजांचा कडकडाट आणि वारा आसनार आहे… या पावसात तलाव, धरणे आणि विहिरी भरल्या जातील अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.

 

 

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com