नैऋत्य मोसमी वारे कमजोर पुढचे तीन दिवस पाऊस कसा राहिल – रामचंद्र साबळे..
नैऋत्य मोसमी वारे – जेष्ठ हवामान तज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांनी दि. 15/ऑगस्ट रोजी हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार राज्यातील पावसाचा जोर पुढचे तीन दिवस कमी राहणार असून नैऋत्य मोसमी वाऱ्याचा प्रभाव पुर्णपणे कमी होत चालला असून त्यामुळे पावसाचा जोर ओसरला आहे. नैऋत्य मान्सूनचा अस्त होऊन ईशान्य मान्सून सक्रीय होण्याचा टप्पा सध्या सुरू आहे.
हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढे तीन दिवस पाऊस अतिशय कमी राहणार आहे. कोकणात आणि उत्तर महाराष्ट्रात अतिशय कमी तर हलक्या पावसाचा अंदाज शनिवार पर्यंत असेल.
हे वाचा – लाडकी बहिण योजनेचे पैसे फक्त या बॅंकेत जमा होणार – तुमची बॅंक कोणती तपासा
मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातल्या सुद्धा येत्या तीन दिवसात हलक्या सरी बरसतील असे डॉ रामचंद्र साबळे यांनी सांगितले आहे. सध्या हवेचा दाब वाढला असल्याने पावसात उघाड पडण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान शाखेच्या आकडेवारीनुसार डॉ रामचंद्र साबळे यांनी हवामान अंदाज वर्तवला आहे. तसेच नैऋत्य मोसमी वाऱ्याचा प्रभाव कमी झाला असून ईशान्य मोसमी वारे सक्रिय होण्याचा टप्पा सध्या सुरू असुन तसेच हवेचा दाब वाढला असल्याने पाऊस पुढचे तीन दिवस खुप कमी राहणार आहे असे डॉ रामचंद्र साबळे यांनी सांगितले आहे.आधिक माहिती खालील youtube वीडियो मधे पहा.