कापूस सोयाबीन अनुदानासाठी EKYC करावे लागेल का?

कापूस सोयाबीन अनुदानासाठी EKYC करावे लागेल का?

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकार हेक्टरी 5000 रुपये अनुदान देणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन ची पेरणी केली होती तसेच ईपिक पाहणी केली होती असे शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत.या अनुदानासाठी आधारशी संबंधित माहिती वापरण्यास सहमती दर्शविणाऱ्या शेतकऱ्यांकडून अर्ज भरले जात आहेत. तसेच, कापूस आणि सोयाबीन अनुदानाची स्थिती तपासण्यासाठी एक पोर्टल तयार करण्यात आले असून या पोर्टलवर शेतकरी त्यांचा आधार क्रमांक टाकून अनुदानाची स्थिती तपासू शकतात.

कापूस सोयाबीन अनुदानाची स्थिती तपासण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पोर्टलमध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी अद्यापही या पोर्टलवर अनुदानाची स्थिती तपासू शकलेले नाहीत. हे पोर्टल लवकरच अपडेट केले जाईल आणि पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. https://scagridbt.mahait.org/FarmerLogin/Login

कापूस आणि सोयाबीनसाठी प्रति हेक्टर 5000 रुपये DBT द्वारे आधार लिंक्ड बँकांना पाठवले जातील. हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी नमो शेतकरी योजनेचा डेटा वापरला जाईल. जे शेतकरी नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना या पोर्टलवर EKYC पूर्ण करण्यास सांगितले आहे परंतु जे शेतकरी नमो शेतकरी, PM किसान योजनेचे लाभार्थी नाहीत त्यांना EKYC करण्यास सांगितले आहे.

कापूस आणि सोयाबीन साठी ईकेवायसी कुठे आणि कसे करायचे याबाबत प्रशासनाने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. लवकरच येणाऱ्या अपडेटची माहिती आम्ही तुम्हाला नक्कीच पाठवू. (Government scheme)

खाली कापूस आणि सोयाबीन अनुदानाची स्टेट्स तपासण्यासाठी अधिकृत पोर्टल लिंक आहे. अधिक माहितीसाठी खालील YouTube व्हिडिओ पहा.

(https://scagridbt.mahait.org/FarmerLogin/Login)

 

हे वाचा – तुम्हाला कापूस सोयाबीन अनुदान (हेक्टरी 5000 रूपये) मिळाले का चेक करा

 

Subsidy status check ; कापूस सोयाबीन अनुदान आले का चेक करा ऑनलाईन मोबाईल वर…

Leave a Comment