Ration card news ; दोन मिनिटांत ऑनलाइन शिधापत्रिकेवरील नाव कमी करा….
Ration card news ; शिधापत्रिका अत्यंत महत्त्वाची असून अनेक सरकारी योजनांमध्ये त्याचा वापर केला जातो. सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यांसारख्या योजनांसाठी शिधापत्रिका हे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. रेशन कार्डचा वापर धान्य वितरण, रुग्णालये आणि इतर अनेक सरकारी योजनांसाठी केला जातो.
माहेरच्या रेशनकार्डमधून विवाहित महिलेचे नाव कट करण्यासाठी तहसील कार्यालयात जाण्याची गरज नाही, तसेच घरातील मृत व्यक्तीच्या शिधापत्रिकेतूनही रेशनकार्ड कट करण्याची गरज नाही. केंद्र सरकारच्या अधिकृत ॲप्लिकेशनवरून तुम्ही शिधापत्रिकेवरून नाव कमी करण्याची प्रक्रिया केवळ दोन मिनिटांत पूर्ण करू शकता. Ration card news
रेशन कार्डमधुन ऑनलाईन नाव कट करण्यासाठी (mera ration 2.0) हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा
रेशनकार्डवरून ऑनलाइन नाव कसे कमी करायचे ते स्टेप बाय स्टेप पाहू.
१) सर्वप्रथम mera ration 2.0 हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा.
२) नंतर भाषा निवडा आणि तुमचा आधार क्रमांक टाका आणि कॅप्चा टाका त्यानंतर तुमच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल तो OTP टाका.
3) त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये चार अंकी पासवर्ड टाकावा लागेल.
4) वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमचे रेशन कार्ड तुमच्या मोबाईलवर उघडेल.
5) रेशन कार्ड उघडल्यानंतर, प्रथम पर्यायावर क्लिक करा (manage family details)
6) त्यानंतर तुम्हाला ज्या सदस्याचे नाव हटवायचे आहे त्यांच्या नावासमोरील डिलीट पर्यायावर क्लिक करा.
7) डिलीट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा कन्फर्म करा. पुढे तुम्हाला विचारले जाईल की तुम्ही नाव का हटवत आहात, ते निवडा, त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाइलवर तुमच्या आधारशी लिंक केलेला OTP मिळेल, तो OTP टाका.
रेशन कार्डमधुन ऑनलाईन नाव कट करण्यासाठी (mera ration 2.0) हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा
ओटीपी टाकल्यानंतर तुमच्या रेशनकार्ड शिधापत्रिकेतून नाव काढून टाकण्यासाठी तहसील कार्यालयाला विनंती केली जाईल. तहसील कार्यालयाने विनंती मान्य केल्यावर तुमचे नाव शिधापत्रिकेतून कमी केले जाईल. वरीलप्रमाणे तुम्ही शिधापत्रिकेवरून नाव कमी करू शकता. अधिक माहितीसाठी खालील YouTube व्हिडिओ पहा..