Crop insurance ; पिकविमा आला नाही येथे करा तक्रार , संपूर्ण प्रोसेस…
Crop insurance ; गेल्या हंगामात अनेक नैसर्गिक आपत्ती मुळे शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर क्लेम केले होते. शेतकऱ्यांनी केलेल्या क्लेम विमा कंपनीने छानणी न करता रिजेक्ट केले होते आणि शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळाला नव्हता.
ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते आणि तरीही पिकविमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना तालुकास्तरावरील कृषी अधिकारी यांच्याकडे 03/सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तरी ज्या शेतकऱ्यांना 2023 मध्ये क्लेम करूनही पिकविमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी..
तक्रार करण्यासाठी खालील संपूर्ण अर्ज भरून द्यावा. या तक्रारी मध्ये गावाचे नाव, तालुका, जिल्हा, गट क्रमांक, क्लेम केलेली तारीख, Docket id , पिकविमा पावती क्रमांक, याआधी काही पिकविमा मिळाला असेल तर ती रक्कम आणि तुमची तक्रार साधारण 50 शब्दात नमूद करुन खाली सही करून कृषी अधिकारी यांच्या कडे द्यावे.
पिकविमा तक्रार करण्यासाठी 03/सप्टेंबर हि शेवटची तारीख दिलेली आहे जर तुम्हाला 2023 मध्ये क्लेम करून सुद्धा पिकविमा मिळाला नसेल तर तुम्ही लवकर कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.