ला-निना स्थिती कधी सक्रिय होणार ; अनेक भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा

ला-निना स्थिती कधी सक्रिय होणार ; अनेक भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा….

 

ला-निना स्थिती ; यंदा आतापर्यंत पावसाने सरासरी गाठली असली तरी जुन, जुलै तसेच ऑगस्ट चा आतापर्यंत च्या कालावधीत पावसाचे असमान वितरण झाले आहे. महाराष्ट्रात पाहिले तर गेल्या अडीच महिण्यात कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला तर विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने सरासरी गाठली आहे. ऑगस्ट मध्ये गेल्या 15 दिवसात पावसाची रिपरीप सुरू होती त्यामुळे पाऊस सरासरी पेक्षा कमी नोंद झाली.

हवामान खात्याने यंदा देशात ला-निना स्थिती निर्माण होऊन सरासरी पेक्षा अधिक पावसाचा अंदाज जूनमध्ये वर्तवला आहे. पण अद्याप ला-निना स्थिती निर्माण झाली नसल्याने पावसाने जोर धरला नाही. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.

 

हवामान विभागाने दिलेल्या नवीन माहिती नुसार ला-निना स्थिती ऑगस्ट च्या शेवटी निर्माण होईल व देशात मान्सून चा जोर वाढेल. सध्या मान्सून मिशन क्लायमेंट फोरकॉस्ट सिस्टीम च्या अंदाजानुसार सध्या अल निनो साऊथर्न ऑस्किलेशन म्हणजे तटस्थ स्थितीत आहे. ला-निना स्थिती ऑगस्ट च्या शेवटी निर्माण होण्याची शक्यता आहे. ला-निना स्थिती भारतीय मान्सून साठी पोषक मानले जाते.

आज 17/ऑगस्ट रोजी राज्यात अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील चार दिवस विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता आहे तर कोकण आणि मध्य दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

 

 हे वाचा – लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही कधी मिळणार जाणून घ्या – हे करावे लागेल

 

Ladki bahin yojna ; लाडकी बहीण योजनेचे 3,000 रूपये मिळाले नाही कधी मिळणार

Leave a Comment