सोयाबीन शेंगा भरण्यासाठी हि करा शेवटची फवारणी ; टपोरे दाणे – उत्पादनात वाढ

सोयाबीन शेंगा भरण्यासाठी हि करा शेवटची फवारणी ; टपोरे दाणे – उत्पादनात वाढ…. 

 

सोयाबीन शेंगा ; सध्या सोयाबीन फुलांतुन शेंगा भरण्याच्या टप्प्यात आहे. सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत अन्नद्रव्यांची कमतरता पडल्यास उत्पादनात शेंगा चांगल्या भरत नाही. काही शेंगाचे सगळे दाणे परिपक्व होत नाही परीणामी सोयाबीनच्या उत्पादनात 15 ते 20 टक्क्यांनी घट होते. शेंगा भरण्याच्या अवस्थेत सोयाबीनला योग्य अन्नद्रव्यांची फवारणी केल्यास शेंगा चांगल्या भरतात दाणे टपोरे होतात व उत्पादन 15/20 टक्के वाढते.

 

सोयाबीन उत्पादन वाढण्यासाठी व शेंगा दाणे चांगले भरण्यासाठी खालील घटकांची फवारणी करावी. 

1) अमीनो जेल (Amino gel) ; अमिनो जेलमध्ये 90% अमिनो जेल मिळते  याच्या फवारणी मुळे सोयाबीनच्या पानात जास्त दिवस हरितद्रव्य साठवून राहतात पाने लवकर पिवळी पडत नाहीत परीणामी शेंगा भरण्याच्या अवस्थेत सोयाबीनला अन्नद्रव्यांची कमतरता भासत नाही व शेंगा चांगल्या भरतात व टपोरे दाणे पडतात. याचे प्रमाण 15 लिटर च्या पंपासाठी 30 ग्रॅम म्हणजेचे एक लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम याप्रमाणे याची फवारणी करावी.

2) Gibberellic acid ; शेवटच्या फवारणी मध्ये शेंगा चांगल्या भरण्यासाठी व शेंगातील सर्व दाणे टपोरे होण्यासाठी जिब्रालीक ॲसिड चा वापर सोयाबीन पिकावर करणे आवश्यक आहे. Gibberellic acid च्या वापराने सोयाबीनच्या शेंगातील दाणे चमकदार व टपोरे होतात. याचे प्रमाण 15 लिटरच्या पंपासाठी 30 ml याप्रमाणे याची फवारणी करावी.

 

https://maharashtra-live.com/सोयाबीन-शेंगा/ ‎

 

3) मायंक्रोन्युट्रियंट ; सोयाबीन भरण्याच्या अवस्थेत सोयाबीनला आवश्यक असलेल्या सुक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करणारे कोणत्याही चांगल्या कंपनीचे मायंक्रोन्युट्रियंट चा शेवटच्या फवारणी मध्ये अवश्य वापर करावा. मायंक्रोन्युट्रियंट चे प्रमाण 15 लिटरच्या पंपासाठी 30/gm याप्रमाणे घ्यावे.

 

4) अळीनाशक ; शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिकावर अळी चा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेल्या असतो. अळीचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही चांगल्या अळीनाशकाचा शेवटच्या फवारणी मध्ये वापर करावा.

सोयाबीनचे चांगल्या उत्पादनासाठी तसेच अळीचा बंदोबस्त आणि चांगल्या शेंगा भरण्यासाठी वरीलप्रमाणे फवारणी करावी. या फवारणी मुळे शेंगा भरण्यासाठी व किड अळीचा बंदोबस्त योग्य प्रकारे होतो व उत्पादनात वाढ होते.

सोयाबीन शेंगा

 

टिप ; फवारणी करताना कृषी सेवा केंद्र चालकाचा सल्ला अवश्य घ्यावा. फवारणी साठी स्वच्छ पाण्याचा वापर करा. अतिशय कडक उन्हात फवारणी करणे टाळा. पावसाचा अंदाज असल्यास चांगल्या दर्जाचे स्टिकर फवारणी मध्ये वापरा. कंपनीने सांगितल्या प्रमाणे औषधाचे प्रमाण घ्यावे कमी अधिक करु नये. अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहा… धन्यवाद…

 

 

Leave a Comment