कापूस सोयाबीन अनुदान या तारखेपासून येणार खात्यात – नवीन यादी येणार.. 

कापूस सोयाबीन अनुदान या तारखेपासून येणार खात्यात – नवीन यादी येणार.. 

 

कापूस सोयाबीन ; राज्य सरकारने घोषणा केल्याप्रमाणे कापूस आणि सोयाबीन पिकासाठी हेक्टरी 5000 याप्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. या साठी कृषी सहाय्यकाकडे आधार संबंधित डाटा वापरण्याचे सहमती पत्र देऊन अर्ज भरणे सुरू आहे. या अनुदान वाटपासाठी कृषी विभागाने कृषी सहाय्यकाकडे पाठवलेल्या याद्यांमध्ये ई-पिक करून सुद्धा अनेक शेतकऱ्यांची नावे आले नाहीत.

 

ज्या शेतकऱ्यांनी 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन पिकाची ई-पिक पाहणी केली होती अशा शेतकऱ्यांच्या नवीन याद्या येणार आहेत. या नवीन याद्यांमध्ये नाव आल्यावर शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी अर्ज करता येतील.

 

कापूस आणि सोयाबीन साठी हेक्टरी 5000 याप्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत अनुदान दिले जाणार आहे. एका शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 10000 एवढे अनुदान मिळेल. या अनुदानाचे पैसे DBT द्वारे थेट आधार संलग्न बॅंक खात्यात जमा होणार आहे.

 

कापूस आणि सोयाबीन अनुदान खात्यात कधी येणार…

 

कापूस आणि सोयाबीन पिकाचे हेक्टरी 5000 रूपये दि.21/ऑगस्ट पासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. यामध्ये जसे शेतकऱ्यांचे अर्ज पात्र होतील तसे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. कापूस आणि सोयाबीन चे अनुदान खात्यात येण्यासाठी तुमच्या बॅंक खात्याला आधार लिंक असने आवश्यक आहे. हे पैसे DBT द्वारे थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यात जमा होणार आहे त्यामुळे तुमच्या बॅंक खात्याला आधार लिंक असने आवश्यक आहे.

 

अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहा तसेच हवामान अंदाज, शेतीविषयक नवनवीन माहिती, योजनेची माहिती आणि ईतर महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या whatsaap group मध्ये सामील व्हा तसेच हि माहिती इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा.

 

Leave a Comment