आसना चक्रीवादळ ; 50 वर्षांत पहिल्यांदा जमीनीतून समुद्राकडे चक्रीवादळ…
आसना चक्रीवादळ ; नेहमी समुद्रातून चक्रीवादळ निर्माण होतात अन् जमीनवर येऊन बरसतात. परंतु गुजरामधील अरबी समुद्रात उलटा प्रवास होत आहे. गुजरामध्ये कमी दाबाच्या पट्यामुळे मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर आता समुद्रात परिणाम दिसणार आहे. समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले असून त्याला ‘आसना’ (ASNA) हे नाव दिले आहे. ‘आसना’मुळेच गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये अतीवृष्टी झाले.
भारतीय हवामान विभागाने कच्छमधील खाडीवरील जमिनीत चक्रीवादळ निर्माण झाल्याची माहिती दिली. या चक्रीवादळास ‘आसना’ हे नाव दिले आहे. पाकिस्तानने हे नाव दिले आहे. गेल्या 50 वर्षांत चक्रीवादळ समुद्राच्या किनारी असलेल्या जमिनीवर तयार झाल्याचे हे पहिले उदाहरण आहे. हे चक्रीवादळ आता समुद्राच्या दिशेने जात आहे.
31 Aug: 10 am Depression ovr WC & adj NW Bay of Bengal.
Likely to move further w-nw,wards & cross N Andhra Pradesh & adj S Odisha coasts betn Vishakhapatnam & Gopalpur close to Kalingapatnam around midnight of today;31st August 2024
IMD pic.twitter.com/AoOosWp00L— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 31, 2024
आयएमडीच्या माहितीनुसार, ‘आसना’ चक्रीवादळ 1944, 1964 आणि 1976 मध्ये आले होते. यापूर्वी 1976 मध्ये ओरिसामधील जमिनीवर चक्रीवादळ आहे. 1944 मध्ये आलेल्या चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केले होते. त्यानंतर 1964 मध्ये चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर तयार झाले होते.
दुर्मिळ घटना असल्याचा दावा
अहमदाबादमधील आयएमडीचे शास्त्रज्ञ अशोक कुमार दास यांनी म्हटले की, जमिनीवर चक्रीवादळ तयार होण्याची घटना दुर्मिळ आहे. यापूर्वी अशी घटना 1976 मध्ये झाली होती. नेहमी समुद्रात चक्रीवादळ तयार होते अन् जमिनीवर थांबते. परंतु आता त्याच्या उलट झाले आहे.
31 Aug: 10 am Depression ovr WC & adj NW Bay of Bengal.
Likely to move further w-nw,wards & cross N Andhra Pradesh & adj S Odisha coasts betn Vishakhapatnam & Gopalpur close to Kalingapatnam around midnight of today;31st August 2024
IMD pic.twitter.com/AoOosWp00L— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 31, 2024
चक्रीवादळ पश्चिम-वायव्य दिशेने सरकणार
आयएमडीने म्हटले आहे की, गुजरात आणि पाकिस्तानमधील कच्छजवळील भागात आणि ईशान्य अरबी समुद्रावर तयार झालेल्या ‘खोल दाब’मुळे चक्रीवादळ तयार झाले आहे. हे 6 किमी/तास वेगाने पश्चिमेकडे अरबी समुद्रात सरकले आहे. पाकिस्तानने या चक्रीवादळाला ‘आसना’ असे नाव दिले आहे. ते पुढील दोन दिवस भारतीय किनारपट्टीपासून उत्तर-पूर्व अरबी समुद्रावर अंदाजे पश्चिम-वायव्य दिशेने सरकत राहील.
31 Aug, As per IMD model guidance, on current position of low pressure system ovr BoB & it’s probable N-NW movement.
Model guidance for Possibility of total rainfall from Day 1- Day 3; Enhanced RF over parts of central India, including parts of Maharashtra. Watch IMD forecast pl. pic.twitter.com/cSlf1UKvf3— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 31, 2024
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन राजीवन यांनीही एक्सवर ट्विट लिहीत आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, उत्तर अरबी समुद्रावर झालेला बदल पाहून आश्चर्य वाटते. या महिन्यात उत्तर अरबी समुद्र थंड असतो हे आपल्याला नेहमीच माहीत आहे. परंतु आता येथे चक्रीवादळ तयार झाले. म्हणजे हा भाग गरम आहे. जे ग्लोबल वॉर्मिंग आणि स्थानिक पातळीवर वाढत्या तापमानाचा परिणाम आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका मात्र नाही परंतु पावसाचा जोर किंचित वाढणार आहे त्यामुळे 30 ऑगस्ट ते 02 सप्टेंबर पर्यत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.