Weather forecast ; आज या भागात जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा..
अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालवरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज कोकण, मध्य मध्यराष्ट्रातील घाटमाता आणि विदर्भात अतिवृष्टीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) जारी केला आहे. पश्चिम बंगाल आणि परिसरात कमी दाबाचे क्षेत्र कायम असून, ही प्रणाली झारखंडकडे सरकत आहे. दरम्यान, अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, ही प्रणाली नाहीशी होत आहे.
22 Aug, Rains forecast by IMD for 4 weeks
Wk 1:Higher amt of rain likly ovr Konkan-Goa,Gujarat,West M.P., Jharkhand adj Bihar & U.P.Above normal RF likly on West coast,Central India & some parts of E India in week. Below normal RF likly ovr NE India,HP & Uttarakhand pic.twitter.com/9T7AIxKXSO— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 22, 2024
या प्रणालीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राजस्थानमधील बिकानेर, सीकर, ओराई, चुर्क, देहरी, कमी दाबाचे केंद्र ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत मान्सूनचा अक्ष सक्रिय आहे. उत्तर बंगालच्या उपसागरात चक्री वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक 35.6 अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात अनेक ठिकाणी तापमान 34 अंशांच्या पुढे आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे.
23 Aug:महाराष्ट्र किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र.
कमी दाबाच्या क्षेत्रापासून कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राचा किनारा ते उत्तर केरळ किनारपट्टी. (offshore trough)
पुढील 4, 5 दिवसांत राज्यात मुसळधार-अतिमुसळधार पावसाची शक्यता.काही ठिकाणी मेघगर्जनेसह.
IMD pic.twitter.com/4yDwVuiPpm— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 23, 2024
आज राज्यात पावसाचा जोर वाढणार असून, कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, मध्य महाराष्ट्रातील सातारा, विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. (ऑरेंजअलर्ट). मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा (येलो इशारा) जारी करण्यात आला आहे, तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे.
Cloud bands over west coast Maharashtra to Gujarat are observed. Models are indicating possibility of enhanced rainfall over parts of North Konkan and adj areas in next 24 hrs.
Watch for IMD updates pic.twitter.com/MsW7MVl4eI— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 23, 2024
अतिवृष्टीचा इशारा (ऑरेंज अलर्ट): पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर
अतिवृष्टीचा इशारा
(यलो अलर्ट): सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, वर्धा, नागपूर, गडचिरोली.
यलो अलर्ट (यलो अलर्ट): नंदुरबार, धुळे, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ.
हे वाचा – 50 हजार प्रोत्साहन अनुदानाची यादी आली लवकर ईकेवायसी करा – यादी डाऊनलोड करा