Rain updates ; आज राज्यात या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा
Rain updates ; गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र, आता राज्यात पावसाचा जोर ओसरू लागला आहे. आज, हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा यलो इशारा जारी केला आहे. पुढील दोन ते पाच दिवस विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात हवामान बहुतांशी स्वच्छ राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यात आज पालघर, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर. जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धारशिव विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तर पुणे आणि बुलढाणा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले. नदीला पूर आल्याने अनेक ठिकाणी संपर्क तुटला.
जनावरांच्या गोठ्यात तसेच घरांमध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. हवामान खात्याने पुढील पाच दिवस विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम बुलढाणा आणि यवतमाळ तसेच कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शनिवारपासून संपूर्ण राज्यात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे.