Namo shetkari 4 installment अखेर प्रतिक्षेत असलेल्या नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित

Namo shetkari 4 installment अखेर प्रतिक्षेत असलेल्या नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित….

 

Namo shetkari yojana ; नमस्कार शेतकरी मित्रांनो, पिएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू केली असून,नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये मानधन मिळत आहे . नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत तीन हप्त्यांचे वितरण झाले होते , परंतु चौथ्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना खुप प्रतिक्षा करावी लागली होती.

 

परळी येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सव कार्यक्रमाच्या दरम्यान केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्यांचे वितरण करण्यात आले आहे.

 

नमो शेतकरी योजनेचा निधी दोन दिवसांपूर्वी मंजूर करून , आज या हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यात आले आहे . राज्यातील 90 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे . राज्यातील पात्र झालेल्या 90 लाख 88 हजार 556 शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.

 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता येणार की , नाही अशी शेतकऱ्यांना प्रश्न निर्माण झाला होता , मात्र पाच महिने प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे . आज 21 ऑगस्ट रोजी नमो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com