E-peek pahni सोयाबीन कापूस अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना 20/हजार मिळणार
E-Peek pahni ; गेल्या वर्षी 2023 च्या खरीप हंगामात ई पीक पाहणी करून ही सातबारावर सोयाबीन कापूस पिकांची नोंद नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नाव अनुदान यादीत आले नाही, त्यामुळे अनेक शेतकरी तक्रार करत होते.
या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतील कार्यक्रमात भाषणा दरम्यान ई पीक पाहणी नोंदची अट रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांसमोर ई पीक पाहणी अट रद्द करण्याची घोषणा केली. पण या अनुदान वाटपाचा शासन निर्णय (GR) आला असुन ई-पीक पाहणी अट कायम आहे. त्यामुळे ई पीक पाहणी न केलेली शेतकरी या अनुदानासाठी अपात्र ठरणार आहेत.
2023 च्या खरीप हंगामात सोयाबीन कापसाचे दर हमीभावाच्या खाली राहिल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे राज्य सरकारने 2023 च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी नोंद असलेल्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट एक हजार तर 0.2 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5 हजार रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेतला. पण त्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
हे वाचा – कापूस आणि सोयाबीन अनुदान GR आला ; या शेतकऱ्यांना 20 हजार रुपये अनुदान
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे ई-पीक पाहणी अट रद्द करणे अपेक्षित होते परंतु शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर अनुदान वाटपाची प्रक्रिया स्पष्ट झाली आहे तरी ई-पीक पाहणी न केलेले शेतकरी या अनुदानातून अपात्र होणार आहे. सरकारने परळी येथील कार्यक्रमात तात्पुरती घोषणा करून वेळ मारुन नेली असून केलेल्या घोषणा हवेत विरल्या आहेत.
ई-पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन अनुदान मिळण्याची शक्यता सध्या तरी शासन निर्णयानुसार दिसत नाही. यावर शासन काही पर्याय उपलब्ध करून देणार का किंवा नवीन शासन निर्णय निर्गमित करणार याबाबत पाहण्यासारखे राहिल.
हे वाचा – कापूस आणि सोयाबीन अनुदान GR आला ; या शेतकऱ्यांना 20 हजार रुपये अनुदान
सोयाबीन कापूस अनुदान शासन निर्णय आला ; या शेतकऱ्यांना 20 हजार रुपये अनुदान मिळणार