Crop insurance claim पिकाचे नुकसान झाले तर असा करा क्लेम…
Crop insurance claim प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकाचं नुकसान झाल्यास विमा संरक्षण दिले जाते.भरपुर कारणांमुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्यावर विमा दिला जातो. त्यामुळे हि शेतकऱ्यांना हि योजना लाभदायक ठरलेली आहे. प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीने पिकाची पेरणी न झाल्यास तसेच दुष्काळ पडने, विज पडने, गारपीट, किड व रोग , चक्रिवादळ , नैसर्गिक आग अश्या कारणांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण दिले जाते.
Crop insurance policy प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत तुम्ही विमा भरलेला असेल तर तुम्हाला 72 तासांच्या आत विमा कंपनीला ऑनलाईन पद्धतीने क्लेम करून करावा लागतो तरच तुम्ही पिकविण्यासाठी पात्रं होणारं असं पिकविण्याच्या नियमानुसार विमा कंपनीकडून सांगितलेले आहे.
crop insurance अँप डाउनलोड करा.
पिक नुकसानीची माहिती विमा कंपनीला देताना crop insurance या ॲप्लिकेशन चा वापर करावा. या ॲप्लिकेशन वर क्लेम कसा करावा याबाबत सविस्तर माहिती पाहुया…
crop insurance असा करा पिकविम्याचा क्लेम…
1) सर्वप्रथम google play store वर जाऊन crop insurance अँप डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central
2) हे अँप्लीकेशन उघडल्या नंतर Language वर क्लिक करून भाषा निवडा .
3) त्यानंतर खात्याशिवाय काम सुरु ठेवा या ॲप्शनवर क्लिक करा.
4) त्यानंतर पिक नुकसानीची पुर्व सुचना पर्यायावर क्लिक करा.
4) आता मोबाइल नंबर टाकुन (OTP) ओटीपी येईल तो टाकुन घ्या.
5) यानंतर खरीप,रब्बी हंगाम निवडा,वर्ष निवडा,प्रधानमंत्री पीक विमा योजना,राज्य निवडुन खालील हिरव्या रंगाचा बटनावर क्लिक करा.
6) त्यानंतर पिक नुकसानीच्या घटना नोंदवण्यासाठी घटनेचा प्रकार, पिक वाढीचा टप्पा, पिकाच्या नुकसानीची टक्केवारी ,पिक नुकसानीचा फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करा.
7) हि सर्व माहिती भरल्यावर सबमिट या बटनावर क्लिक करा तुमचा पिक विमा क्लेम यशस्वीपणे पूर्ण होईल. तसेच तुम्हाला Docet ID येईल त्याचा स्किनशाँट काढुन ठेवा.
या डाँकेट आयडीद्वारे तुम्हाला पीक नुकसानीची स्थिति पाहता येईल.
वरील प्रमाणे पुर्णपणे प्रोसेस पुर्ण केल्यानंतर तुमचा क्लेम पुर्ण होईल. कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती पासून पिकाचे नुकसान झाल्यास 72 तासांच्या आत इन्शुरन्स कंपनीला कळवावे…
crop insurance अँप डाउनलोड करा.