Crop insurance पावसामुळे नुकसान झाल्यास 72 तासांच्या आत विमा कंपनीला कळवा….

¶Crop insurance पावसामुळे नुकसान झाल्यास 72 तासांच्या आत विमा कंपनीला कळवा….

Crop insurance updates नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पिक नुकसानीची माहिती विमा कंपनीला 72 तासांच्या आत कळवावे असे आवाहन सोलापूर चे जिल्हाधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे. पिक नुकसानीची माहिती देण्यासाठी विमा कंपनीचा टोल फ्री नंबर किंवा crop insurance या मोबाईल ॲप्लिकेशन चा वापर करावा. विमा कंपनीला पिक नुकसानीची माहिती देण्याची मुदत 72 तासाची ठरवली आहे.

सध्या राज्यातील वेगवेगळ्या भागांत अती मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. पिकविमा मिळवण्यासाठी पिक नुकसानीची माहिती विमा कंपनीला देणे बंधनकारक आहे. तरच तुम्ही पिकविम्यासाठी पात्र व्हाल. विमा कंपनीच्या हेल्पलाईन नंबर वर आपण आपल्या पिकाचा वैयक्तिक क्लेम करु शकतो. असे आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी शेतकऱ्यांना केले आहे..

 

Crop insurance हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा येथे क्लिक करा

 

 

पिकाच्या पेरणी पासून ते पिककापणी पर्यंत अती पावसामुळे, गारपिटीमुळे, ढगफुटीमुळे किंवा विज पडल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडून वैयक्तिक स्तरावर पंचनामा करण्यात येतो. सध्या काही पिकाची कापणी सुरू आहे तर काही पिके काढणीसाठी लवकरच येत आहे तरी अती पावसामुळे जर तुमच्या पिकाचे नुकसान झाल्यास तुम्ही crop insurance या मोबाईल ॲप्लिकेशन च्या माध्यमातून किंवा विमा कंपनीच्या हेल्पलाईन नंबर वर संपर्क साधुन आपला वैद्यकीय क्लेम करु शकता.

पिक कापणी नंबर शेतात पीक असताना सलग पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्यास जास्तीत जास्त 14 दिवस आपण आपल्या पिकाचा क्लेम करु शकतो. तुमच्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी नियुक्त आहे हे पाहून 72 तासांच्या आत विमा कंपनीच्या हेल्पलाईन नंबर वर संपर्क साधुन किंवा crop insurance या मोबाईल ॲप्लिकेशन चा वापर करून क्लेम करावा.

Crop insurance हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com