CM Eknath Shinde ; लाडका शेतकरी योजना येणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा

CM Eknath Shinde ; लाडका शेतकरी योजना येणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा

 

CM Eknath Shinde : लाडकी बहीण, भाऊनंतर आता लाडका शेतकरी योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलीयं. बीडमध्ये आज राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट उपलब्ध करुन देणं हे महायुती सरकारचं काम आहे. आम्ही पॅकेट नाही तर शेतकऱ्यांना थेट मार्केट देण्याचं काम करीत आहोत. आमच्या सरकारचं धोरण कष्टकरी, वारकरी, शेतकरी सुखी हेच आहे. त्यामुळे आता आम्ही लाडका शेतकरी योजना राबवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीयं.

 

CM Eknath Shinde काय म्हणाले मुख्यमंत्री? आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. त्यानंतर अन्नपूर्णा योजना आणली. त्यानंतर लाडका भाऊ योजना आणली. आता आम्ही लाडका शेतकरी योजना राबवणार आहोत. सर्व भाऊ लाडके झाले, सर्व बहीणी लाडक्या झाल्या, आता शेतकरीही लाडका होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय.

 

तुम्हाला आले का चेक करा – अचानक मोठी खुशखबरः नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता खात्यात जमा

 

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु करण्यात येत आहे. विविध नेत्यांचे राज्यभर दौरे सुरु आहेत. अशातच मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना सुरु केलीयं. या योजनेची चर्चा सुरु असतानाच आता लाडकी शेतकरी योजनेची घोषणा करण्यात आलीयं. त्यामुळे आता या योजनेचीही राज्यभरात चांगलीच चर्चा होईल.

 

 

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com