50 हजार प्रोत्साहन अनुदानाची यादी आली लवकर ईकेवायसी करा

50 हजार प्रोत्साहन अनुदानाची यादी आली लवकर ईकेवायसी करा

50 हजार प्रोत्साहन ; राज्य सरकारने 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना तसेच 2019 मध्ये महात्मा फुले कर्जमुक्ती योजना राबवून राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला होता. कर्जमाफी झाल्यावर जे शेतकरी नियमित आपल्या कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना कर्जफेड करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी सन 2017-18 , 2018-19 , 2019-20 या तीन आर्थिक वर्षापैकी दोन वर्षात आपल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदानाचा लाभ दिला जात आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2019 अंतर्गत 50 हजार प्रोत्साहन योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या (विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या) परंतू आधार प्रमाणीकरण न झालेल्या 33356 शेतकऱ्यांसाठी महा-आयटी कडून दि. 12/08/2024 ते 07/09/2024 पर्यत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सदर कालावधीत संबंधीत शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे, त्याबाबतचा संदेश शेतकऱ्यांना महा-आयटी मार्फत देण्यात आला आहे. तरी याबाबत संबंधीत बँकांनी सुद्धा शेतकऱ्यांना कळवण्याचे सांगितले आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या बॅंकेत जाऊन अधिक माहिती घेऊ शकता.

शेतकऱ्यांनी आपली ईकेवायसी पुर्ण न केल्यामुळे या 50 हजार प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळालेला नाही. तरी तुम्ही 50 हजार प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र असाल तरी आपल्या बॅंकेत जाऊन अधिक माहिती घ्यावी. 50 हजार प्रोत्साहन अनुदानाचा लाभ 33356 एवढ्या शेतकऱ्यांना ईकेवायसी पुर्ण केल्यामुळे मिळालेला नाही.

 

हे वाचा – नमो शेतकरी योजना चौथा हप्ता आला नाही तुमच्या हप्त्यांचे स्टेटस चेक करा

 

आपले सरकार सेवा केंद्रात 50 हजार प्रोत्साहन अनुदानाच्या ई-केवायसी न झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या आल्या आहेत त्या यादीत नाव तपासून विशिष्ट क्रमांक घेऊन तुम्ही लवकर ईकेवायसी करून घ्या. ई-केवायसी केल्यानंतर तुम्हाला 50,000 प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळेल.

50 हजार प्रोत्साहन अनुदानाची यादी येणार नाही तुम्हाला बॅंकेकडून संपर्क केल्या जाईल किंवा मेसेज येतील तुम्हाला बॅंकेकडून संपर्क झाला नाही किंवा मेसेज आला नाही तर तुम्ही तुमच्या बॅंकेत जाऊन अधिक माहिती घ्या व 07/सप्टेंबर पुर्वी ईकेवायसी पुर्ण करा नंतर तुम्हाला तुमच्या आधार लिंक बॅंक खात्यात 50 हजार प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळेल. 50 हजार प्रोत्साहन अनुदानाची यादी डाउनलोड कशी करावी याबाबत अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहा…

 

 

हे वाचा – आधार सिडिंग स्टेटस ॲक्टिव घरबसल्या करा ऑनलाईन आपल्या मोबाईल वर

आधार सिडिंग स्टेटस ॲक्टिव करा घरबसल्या ऑनलाईन आपल्या मोबाईल वर..

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com