सोयाबीन कापूस अनुदान ; गेल्या खरीप हंगामात म्हणजेच 2023 च्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांना मिळणार आहे, म्हणजेच कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कमाल 10,000 रुपये अनुदान म्हणून दिले जाणार आहेत.
मात्र हे अनुदान कापूस अन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कधी मिळणार हा मोठा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार उद्या 21 ऑगस्ट 2024 पासून सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरित केली जाणार आहे.
अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आधार संलग्न बँक खात्याची संमती द्यावी लागणार आहे. यासाठीचे संमती पत्र शेतकऱ्यांनी त्यांच्या कृषी सहायकाकडे जमा करावयाचे सांगन्यात आले होते. ज्या शेतकऱ्यांनी हे संमती पत्र दिलेले असेल त्या शेतकऱ्यांना उद्यापासून अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे. यामुळे राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.
ज्या शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांनाही या अनुदानाचा लाभ दिला जानार आसल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. उद्यापासून हि अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करन्यात येनार आहे.