सोयाबिन फवारणी ; सोयाबीन शेवटची फवारणी जास्त शेंगा टपोरे दाणे

सोयाबिन फवारणी ; सोयाबीन शेवटची फवारणी जास्त शेंगा टपोरे दाणे

सोयाबिन फवारणी ; सध्या सध्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून शेंगा चांगल्या ठासून भरण्यासाठी दाण्यांचा आकार वाढवून शेंगा भरण्यासाठी शेवटची फवारणी अत्यंत आवश्यक आहे. शेवटच्या फवारणीमध्ये किटकनाशक आणि आवश्यक पोषक घटकांची फवारणी केल्याने दाण्यांचा आकार वाढतो आणि शेंगा भरतात आणि शेंगा खाणाऱ्या अळीचे नियंत्रण होते.

सोयाबीनवर अंतिम फवारणीसाठी काय वापरावे.

शेंगा भरण्याच्या अवस्थेत 00-52-34 किंवा 00-00-50 किंवा 13-00-45 विद्राव्य खताची 100 ग्रॅम प्रति पंप या प्रमाणात फवारणी करावी. सोयाबीन वर अंतिम फवारणी करताना वरील पैकी कोणतेही एक विद्राव्य खत वापरणे आवश्यक आहे.

शेवटच्या फवारणीच्या टप्प्यावर, सुरवंटांच्या (अळी) नियंत्रणासाठी सोयाबीनवर कोराझन, इमामेक्टिन, प्रोफेक्स, फेम, डेलिगेट यापैकी कोणत्याही एका कीटकनाशक वापरता येते.

किटकनाशक आणि विद्राव्य खताच्या मिश्रणासह अंतिम फवारणी दाणे भरण्यासाठी आणि अळी नियंत्रणासाठी फायदेशीर आहे. अंतिम फवारणीमध्ये टॉनिकची आवश्यकता नसते. तसेच फवारणी करताना स्वच्छ पाण्याचा वापर करावा आणि फवारणीनंतर बूट, गॉगल व संरक्षक कपडे घालून फवारणी करावी.

हे वाचा – आधार सिडिंग स्टेटस ॲक्टिव घरबसल्या करा ऑनलाईन आपल्या मोबाईल वर

आधार सिडिंग स्टेटस ॲक्टिव करा घरबसल्या ऑनलाईन आपल्या मोबाईल वर..

 

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com