सप्टेंबर मध्ये देशात जोरदार पाऊस या भागात अतिवृष्टी होणार – डॉ मृत्यूंजय महापात्रा

सप्टेंबर मध्ये देशात जोरदार पाऊस या भागात अतिवृष्टी होणार – डॉ मृत्यूंजय महापात्रा

ऑगस्ट पावसाने सरासरी गाठल्यानंतर सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात देशात 109 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विदर्भ, कोकणासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

 

हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी 31/ऑगस्ट रोजी सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला. 1971 ते 2020 कालावधीत दीर्घकालीन सरासरीनुसार सप्टेंबर महिन्यात देशात सरासरी 167.9 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा ऑगस्ट महिनाअखेर देशात 07 % अधिक, तर महाराष्ट्रात तब्बल 26% अधिक पावसाची नोंद झाली आहे.

सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. यात भारताचा अति उत्तरेकडील भाग, दक्षिण द्विपकल्पाचा अंतर्गत भाग, पूर्वोत्तर राज्यासह उत्तर बिहार, उत्तर प्रदेशचा काही भाग वगळता देशात सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. राजस्थान, उत्तराखंडसह हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाना सह मध्य व उत्तर भारतात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे.

सप्टेंबर महिन्यात देशाच्या बहुतांशी भागात कमाल आणि किमान तापमानाचा पारा सरासरीच्या वर राहण्याचा अंदाज आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाला पोषक प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज असल्याने मॉन्सूनचा परतीचा प्रवास यंदा उशिराने सुरू होण्याचे संकेत आहे. मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाबाबत हवामान विभागाकडून पूर्वानुमान देण्यात आलेले नाही. 15 सप्टेंबरपर्यंत मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

 

प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात सध्या सर्वसाधारण स्थिती (एन्सो न्यूट्रल) आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यादरम्यान प्रशांत महासागरात ‘ला-निना’ स्थिती तयार होणार असल्याने नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात ‘ला-निना’चा प्रभाव जाणवणार नाही. मात्र ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या हंगामात मॉन्सूनचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. यातच सप्टेंबर महिन्यात इंडियन ओशन डायपोल (आयओडी) सर्वसाधारण पातळीवर राहण्याचे संकेत आहेत.

 

सप्टेंबरमध्ये राज्यात चांगला पाऊस

सप्टेंबर महिन्यात राज्याच्या बहुतांशी भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाच्या अंदाजावरून स्पष्ट होत आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असली तरी उर्वरित विदर्भ, कोकणासह उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.

डॉ. मृत्यूंजय महापात्रा, महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र विभाग.सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात एकापाठोपाठ कमी दाब प्रणाली तयार होण्याचे संकेत असल्याने पावसाला पोषक हवामान होऊन सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होईल. गेल्या काही वर्षात मॉन्सूनचा परतीचा प्रवास उशिराने सुरू होत असून, यंदा सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर परतीच्या प्रवासाचे चित्र स्पष्ट होईल.

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com