मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तर… लाडकी बहिण योजनेचे 3000 रूपये दर महिन्याला मिळतील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तर… लाडकी बहिण योजनेचे 3000 रूपये दर महिन्याला मिळतील

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रम प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आतापर्यंत 01/ऑगस्ट पुर्वी अर्ज केलेल्या महिलांना दोन महिन्याचे मिळून 3,000 रूपये आधार लिंक बॅंक खात्यात जमा केले आहे. आणि ज्या महिलांचे आधार लिंक झालेले नाही त्या महिलांना आधार लिंक पुर्ण झाल्यावर त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील.

तसेच ज्या महिलांचे अर्ज 01/ऑगस्ट नंतर भरले आहे त्या महिलांचे अर्ज अप्रोवल करण्यासाठी सुरुवात झाली आहे तरी ऑगस्ट महिण्यात अर्ज केलेल्या महिलांना सप्टेंबर मध्ये तीन महिन्याचे मिळून 4,500 रूपये एकदाच त्यांच्या बॅंक खात्यात जमा केले जातील. ऑगस्ट मध्ये केलेल्या अर्ज आता मंजूर करण्यासाठी सुरुवात झाली आहे. (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

 

हे वाचा – लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत काय आहे कारण पहा

 

तसेच शिंदे पुढे म्हणाले की ज्या महिलांचे आधार लिंक नाही त्या महिलांनी आधार लिंक करून घ्यावे. लाडकी बहिण योजनेचे पैसे DBT द्वारे थेट महिलांच्या बॅंक खात्यात जमा केले जातात त्यामुळे बॅंक खात्याला आधार लिंक असने आवश्यक आहे.

 

शिंदे म्हणाले तर… लाडक्या बहिणीला महिन्याला 3,000 मिळणार….

एकनाथ शिंदे म्हणाले सध्या लाडकी बहिण योजनेअंतर्गत दर महिन्याला 1,500 रूपये देतो आहोत. पुढे सरकारला तुम्ही आशिर्वाद दिलेत आणि महायुतीचे सरकार पुन्हा आले तर हळूहळू लाडकी बहिण योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढुन 3,000 रुपयापर्यंत नेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

 

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com