बॅंक खाते आधार लिंक कसे करावे – लाडकी बहिण योजनेचे पैसे तरचं मिळणार

बॅंक खाते आधार लिंक कसे करावे – लाडकी बहिण योजनेचे पैसे तरचं मिळणार

बॅंक खाते आधार लिंक ; सध्या लाडकी बहिण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु लाखो महिलांचे पैसे अर्ज मंजूर असताना आलेले नाहीत. आतापर्यंत अर्ज केलेल्या महिलांपैकी 27 लाख महिलांच्या बॅंक खात्याला आधार लिंक नसल्याची माहिती समोर आली आहे. आधार लिंक नसल्याने या महिलांना लाडकी बहिण योजनेचे दोन हप्त्याचे मिळून 3,000 रुपये मिळाले नाहीत.

ज्या महिलांचे बॅंक खात्याला आधार लिंक नाही त्या महिलांना आधार लिंक केल्यानंतर या दोन हप्त्याचा लाभ मिळेल असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. दि. 17/ऑगस्ट पर्यंत दोन हप्ते तुमच्या बॅंक खात्यात जमा होतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

 

लाडकी बहिण योजनेचे पैसे फक्त या बॅंकेत जमा होणार – तुमची बॅंक कोणती तपासा

Aadhaar link Bank account ; लाडकी बहिण योजनेचे पैसे या खात्यात जमा होणार… 

 

 

तुमच्या बॅंक खात्याला आधार लिंक आहे का चेक करा लिंक नसेल तर लवकर बॅंक खात्याला आधार लिंक करा किंवा पोस्ट बॅंकेत खाते उघडा पोस्ट बॅंकेत खाते उघडल्यावर दोन तीन दिवसात तुमच्या बॅंक खात्याला आधार लिंक होईल.

 

बॅंक खात्याला आधार लिंक कसे करावे..

बॅंक खात्याला आधार लिंक करण्यासाठी तुमच्या बॅंक शाखेत जाऊन एक फॉर्म भरून द्या. त्यासोबत तुमचे आधार कार्ड आणि पासपोर्ट फोटो जोडुन तुम्ही तुमच्या बॅंक खात्याला आधार लिंक करु शकता. बॅंकेत अर्ज दाखल केल्यानंतर बॅंकेच्या नियमानुसार तुमच्या बॅंक खात्याला आधार लिंक होण्यासाठी साधारण आठवडाभराचा कालावधी लागेल.

 

सध्या बॅंकेत लाडकी बहिण योजनेचे पैसे न जमा झालेल्या महिलांचे आधार लिंक करण्याची मोहीम सुरू आहे. त्यामुळे बॅंकेत महिलांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे.

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com