पंजाब डख म्हनतात, राज्यातील पावसाचा जोर वाढनार…या तारखांना अतीव्रुष्टी होनार
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 20 आँगष्ट ते 2 सप्टेंबरदरम्यान पाऊस कसा राहील याबाबत अंदाज जाहीर केला आहे. पंजाबराव डख यांनी दिलेला अंदाज आपण या लेखातून सविस्तर पाहुयात…
राज्यात सर्वच 20 आँगष्ट ते 26 आँगष्टपर्यंत मुसळधार पाऊस पडेल आणि 23-26 आँगष्ट दरम्यान काही ठिकाणी अतीमुसळधार (अतीव्रुष्टी) पाऊस होईल असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे..
26 आँगष्टनंतर पुन्हा एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय होउन पावसाला सुरुवात होईल आणि पोळ्यापर्यंत जोरदार पाऊस बरसनार आहे. म्हनजेच रक्षाबंधन ते पोळा दररोज भाग बदलत राज्यात सर्वत्र चांगला पाऊस बरसनार आहे अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.
बैलपोळ्यापर्यंत राज्यभर सर्वत्र जोरदार पाऊस होईल, हा पाऊस ओढेनाले वाहतील शेतातून पाणी बाहेर निघेल असा होईल…23-26 आँगष्ट काही ठिकाणी अतीव्रुष्टीसारखा धो धो पाऊस होनार आसल्याचा अंदाज पंजाब डख यांनी वर्तवला आहे.
20 आँगष्ट ते 2 सप्टेंबर दरम्यानच्या पावसामुळे धरनातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होईल. तसेच हा पाऊस विजांसह होनार आहे त्यामुळे विजा चमकत आसताना काळजी घ्यावी… विजा चमकत आसताना उंच झाडाखाली बसू नये आणि सुरक्षित ठिकाणी बसावे असेही पंजाब डख यांनी सांगितले.