पंजाब डख live ; राज्यात पावसाचा जोर ओसरला या भागात पावसाचा अंदाज…

पंजाब डख live ; राज्यात पावसाचा जोर ओसरला या भागात पावसाचा अंदाज…

पंजाब डख live ; मराठवाड्यातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज दि. 04/सप्टेंबर रोजी हवामानाचा नवीन अंदाज वर्तवला आहे. आज दिलेल्या नवीन अंदाजानं राज्यातील बहुतांश भागातील पावसाचा जोर ओसरला आहे तसेच सूर्यदर्शन झाले आहे. तसेच आज आणि उद्या पंजाबराव डख यांनी काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे पाहुया सविस्तर..

पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागातील पावसाचा जोर ओसरला असुन कडक सूर्यदर्शन झाले आहे. तसेच पुढे सुद्धा 11/ सप्टेंबर पर्यंत खुप मोठ्या पावसाचा अंदाज नसल्याचे डख यांनी सांगितले आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मुळे अनेक ठिकाणी शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे तरी शेतकऱ्यांना शासनाने लवकर मदत करावी अशी मागणी डख यांनी केली आहे. पंजाब डख live

आज (04/सप्टेंबर) या भागात पावसाचा अंदाज.

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार आज 04/सप्टेंबर रोजी सोलापूर, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच कोकण किनारपट्टी या जिल्ह्यात दुपारनंतर पावसाचा जोर असेल.

उद्या दि 05/सप्टेंबर ला पावसाचा जोर असेल – पंजाबराव डख

सोलापूर ,धाराशिव, बीड, लातूर, बुलढाणा, अकोला, वर्धा, नागपूर भंडारा या भागात पाऊस असेल.तसेच राज्यात 11/सप्टेंबर पर्यंत जोरदार व मोठ्या पावसाची शक्यता नाही तरी शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार पुढचे नियोजन करावे.

 

 

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com