पंजाब डख लाईव्ह ; आज या भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस ; सतर्कतेचा इशारा

पंजाब डख लाईव्ह ; आज या भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस ; सतर्कतेचा इशारा…

पंजाब डख लाईव्ह ; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दि. 02/सप्टेंबर रोजी नवीन अंदाज वर्तवला आहे. एक सप्टेंबर च्या रात्री मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावात पाणी शिरले आहे तसेच काही शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढ्या पुराच्या पाण्यात वाहुन गेल्या आहेत. पंजाबराव डख यांनी शासनाला नुकसान भरपाई देण्याची विनंती केली आहे. तरी ज्या भागात अतिवृष्टी झाली त्या भागातील शेतकऱ्यांनी 72 तासात क्लेम करत पिक नुकसानीची माहिती विमा कंपनीला द्यावी असे शेतकऱ्यांना सांगितले आहे.

 

आज 03/सप्टेंबर रोजी या भागात अतिवृष्टी होणार – पंजाबराव डख

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार आज उत्तर महाराष्ट्रात अति मुसळधार पाऊस होणार आहे, अतिवृष्टी होणार आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नगर, छत्रपती संभाजीनगर या परिसरात आज (03/सप्टेंबर) रोजी अतिवृष्टी होणार असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. तरी सर्व नागरीकांनी सतर्क रहावे. ज्या शेतकऱ्यांची घरे नदीच्या काठावर आहे त्यांनी पाऊस सुरू होताच सावध व्हावे. कारण अतिशय जोरदार पाऊस पडायला आणि घराला पाण्याचा वेढा पडायला तरी पाळीव प्राणी आणि स्वतः अगदी सुरक्षित ठिकाणी थांबा.

आज मराठवाडा विदर्भातील पावसाचा अंदाज..

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार आज मराठवाडा विदर्भात पावसाचा जोर असेल पण तिव्रता कमी होईल. दुपारपर्यंत कडक उन पडेल दुपारनंतर जोरदार पाऊस होईल तरी शेतकऱ्यांनी सतर्क रहावे असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. अनेक ठिकाणी पाऊस जास्त पडला की नदीच्या पुलाच्या व वरुन पाणी जात आहे तरी पुलाच्या वरून पाणी जात असल्यास कुणीही पुल पार करु नये.

 

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी दोन तीन दिवस पावसाचा जोर कायम असेल तरी सर्व नागरिकांनी, शेतकऱ्यांनी, स्वतःची काळजी घ्यावी. पाऊस सुरू होताच लक्ष ठेवावे कारण अतिवृष्टी होत असून घराला पाण्याचा वेढा पडत आहे. तरी सावध राहा असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. पंजाबराव डख यांचा YouTube video येथे पहा.

 

 

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com