पंजाबराव डख ; या भागात अतिवृष्टी होणार तर या भागात महाप्रलय येणार

पंजाबराव डख ; या भागात अतिवृष्टी होणार तर या भागात महाप्रलय येणार

पंजाबराव डख ; सध्या राज्यात जोरदार पाऊस कोसळत आहे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 27/ऑगस्ट पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी महाप्रलय येणार असल्याचे डख यांनी सांगितले आहे पाहुया सविस्तर हवामान अंदाज….

डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार नाशिक परीसरात 100 किमी परीसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दि. 25/ऑगस्ट , 26/ऑगस्ट , 27/ऑगस्ट दरम्यान राज्यात सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज आहे.

दि. 25/, 26/, 27/ऑगस्ट दरम्यान गुजरात मध्ये महाप्रलय येणार असून अतिवृष्टी होणार आहे. एकदम 500 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडेल. पंजाबराव डख

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम-उत्तर महाराष्ट्र तसेच कोकण किनारपट्टी, मुंबई, पुणे, नाशिक या भागात 27/ऑगस्ट पर्यंत जोरदार पाऊस पडेल. दि. 28/, 29/, 30/ऑगस्ट दरम्यान वातावरण ढगाळ होईल व कोरडे हवामान राहिल. स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाचा अंदाज राहिल परंतु सर्वदूर नसेल.

 

31/ऑगस्ट ते 04/सप्टेंबर दरम्यान पुन्हा जोरदार – पंजाबराव डख

पाऊस 28/, 29/, 30/ऑगस्ट दरम्यान पावसाने काहिसी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा 31/ऑगस्ट ते 04/सप्टेंबर दरम्यान राज्यात जोरदार पावसाचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. विशेषतः 25/, 26/, 27/ दरम्यान उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार असून नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होईल व पुर परीस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

पंजाबराव डख यांनी सांगितले की पाऊस सुरू असताना वारे, विजाचे प्रमाण अधिक असेल तरी झाडाखाली जनावरे बांधु नयेत तसेच स्वतः झाडाचा अश्रय घेऊ नये..

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com