पंजाबराव डख ; तीन दिवस पावसात उघडीप पुन्हा जोरदार पाऊस नवीन अंदाज

पंजाबराव डख ; तीन दिवस पावसात उघडीप पुन्हा जोरदार पाऊस नवीन अंदाज

पंजाबराव डख ; पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार 28/ऑगस्ट पासून 29/ऑगस्ट पर्यंत पावसात उघडीप असेल आणि पुन्हा जोरदार पाऊस पडणार आहे. डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार आजपासूनच मराठवाड्यात हवामान ढगाळ वातावरण असुन सूर्यदर्शन होत आहे. तसेच काही ठिकाणी उन्हाचा कडाका वाढला असुन दमटपणा निर्माण झाला आहे.

पंजाबराव डख ; विदर्भ, मराठवाडा, पश्चिम-उत्तर महाराष्ट्र तसेच कोकण किनारपट्टी, मुंबई, पुणे, नाशिक या भागात 27/ऑगस्ट पर्यंत जोरदार पाऊस पडेल. दि. 28/, 29/, 30/ऑगस्ट दरम्यान वातावरण ढगाळ होईल व कोरडे हवामान राहिल. स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाचा अंदाज राहिल परंतु सर्वदूर नसेल.

31/ऑगस्ट ते 04/सप्टेंबर दरम्यान पुन्हा जोरदार – पंजाबराव डख

पाऊस 28/, 29/, 30/ऑगस्ट दरम्यान पावसाने काहिसी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा 31/ऑगस्ट ते 04/सप्टेंबर दरम्यान राज्यात जोरदार पावसाचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. विशेषतः 25/, 26/, 27/ दरम्यान उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार असून नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होईल व पुर परीस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

पंजाबराव डख यांनी सांगितले की पाऊस सुरू असताना वारे, विजाचे प्रमाण अधिक असेल तरी झाडाखाली जनावरे बांधु नयेत तसेच स्वतः झाडाचा अश्रय घेऊ नये..

 

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com